शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागेल :निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 20:16 IST

काश्मीरचा निर्णय योग्य की अयोग्य, हे येत्या काळात कळेल..

ठळक मुद्देसैनिक मित्र परिवारातर्फे सन्मान

पुणे : काश्मीरसह भारताच्या कोणत्याही भागात होणारी हिंसा एका विशिष्ट पातळीपर्यंत थांबवणे, हे सैन्याचे काम आहे. मात्र, उद्रेक होऊन हिंसा वाढू नये, हे पाहणे राज्यकर्त्यांचे काम असते. प्रत्यक्षात काश्मीरप्रश्न हा राजकीय असून कलम ३७० मुळे असलेले निर्बंध शिथील झाल्यानंतर सैन्य व राज्यकर्त्यांना अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागेल, असे मत मेजर जनरल शशिकांत पित्रे (निवृत्त) यांनी व्यक्त केले. सैनिक मित्र परिवार व शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त पराक्रमी सेनाधिकारी शशिकांत पित्रे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी शशिकांत पित्रे यांच्या पत्नी मीरा पित्रे, ज्येष्ठ रक्तदाते दत्तात्रय मेहेंदळे, किरण पाटोळे, आनंद सराफ, पराग ठाकूर, गिरीश पोटफोडे, होनराज मावळे, कल्याणी सराफ, योगिनी पाळंदे आदी उपस्थित होते. महिला कार्यकर्त्यांनी पित्रे यांना सपत्नीक औक्षण केले. सोनचाफ्याच्या फुलांची परडी, तिरंगी उपरणे, घरगुती मिठाई त्यांना भेट देण्यात आली. शशिकांत पित्रे म्हणाले, काश्मीरमधील निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुढील १५ दिवसांत परिस्थिती कशी हाताळली जाते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यावरच काश्मीरचा निर्णय योग्य की अयोग्य, हे समजू शकेल. सरकारने आतापर्यंत परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली आहे. तसेच या प्रश्नी नक्की काय करायचे आहे, ही दिशा सरकारची स्पष्ट आहे.’

 

टॅग्स :PuneपुणेJammu Kashmirजम्मू-काश्मीरCentral Governmentकेंद्र सरकार