शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

कर्वेनगर मुख्य चौक : महिला स्वच्छतागृहाची झाली कचराकुंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 03:16 IST

पुणे महानगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून महिलांच्या सुविधेसाठी शहरात सार्वजनिक महिला स्वच्छतागृहे बांधली. कर्वेनगर येथील मुख्य चौकातील महिला स्वच्छतागृहांचा वापर कचराकुंडी म्हणून करण्यात येत आहे.

पुणे  - पुणे महानगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून महिलांच्या सुविधेसाठी शहरात सार्वजनिक महिला स्वच्छतागृहे बांधली. कर्वेनगर येथील मुख्य चौकातील महिला स्वच्छतागृहांचा वापर कचराकुंडी म्हणून करण्यात येत आहे. त्यामुळे महिलांच्या सार्वजनिक आरोग्याची कोणतीही काळजी पालिकेला नाही असे दिसते. स्वच्छतागृह केवळ ठेकेदारांच्या फायद्यासाठी बांधली जात आहेत का महिलांच्या सुविधेसाठी, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.मुख्य चौकात असलेल्या या स्वच्छतागृहात प्रचंड अस्वच्छता आहे. दुर्गंधीयुक्त पाणी सगळीकडे पसरलेले आहे. कचरा टाकल्यामुळे संडास तुंबलेले आहेत. दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच सर्वत्र पडलेला दिसतो.स्वच्छतागृहाच्या बऱ्याच खोल्यांत पाणी नाही. रात्रीच्या वेळेस आवश्यक विजेची व्यवस्था दिसत नाही. सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या बाजूलाच कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. हीच स्थिती शहरातील बहुतांश स्वच्छतागृहांची झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महिलांची कुचंबणा होत आहे. कर्वेनगर भागात दोन महिला महाविद्यालये व शाळा आहेत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनींची ये-जा असते. स्वच्छतागृहांच्या समोरच पीएमपीचा बसथांबा आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी असते. अस्वच्छ स्वच्छतागृहांचा त्रास प्रवाशांनादेखील होत आहे. प्रवाशांनीदेखील स्वच्छतागृह वापरण्याजोगे स्वच्छ करण्याची मागणी केली आहे.यावरून महिला स्वच्छतागृहांच्या बाबतीत महापालिका प्रशासन गंभीर नाही, हेच दिसून येत आहे. त्याबरोबरच स्वच्छतागृहांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कर्वेनगर येथील सार्वजनिक स्वच्छतागृहांचा प्रश्न गंभीर बनला आहे. महानगरपालिकेने स्वच्छतागृह बांधले. त्यावर पालिकेचे लाखो रुपये खर्च केले. मात्र नियमित देखभाल आणि दुरुस्ती न केल्यामुळे स्वच्छतागृहांची ही अवस्था झाली आहे. यावर पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. स्वच्छतागृहाची साफसफाई केल्यास याचा वापर होईल; अन्यथा स्वच्छतागृहाची कचराकुंडी होईल.महापालिकेने स्वच्छतागृहे बांधली; परंतु स्वच्छत़ागृहांची योग्य देखरेख केली नाही. त्यामुळेच स्वच्छतागृहांची अशी बिकट अवस्था झाली आहे. स्वच्छतागृहांच्या परिसरात कचºयाचे साम्राज्य झाले आहे. मद्यपी येथे दारूच्या बाटल्या फेकतात. पालिका प्रशासनाने याची दखल घ्यावी व स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करावी.- एक महिलाकर्वेनगरच्या पीएमपी बसथांब्यावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. प्रवाशांची रोजची गर्दी लक्षात घेता येथील महिला व पुरुष स्वच्छतागृहांची साफसफाई करणे गरजेचे आहे.- प्रतीक ठाकरे,प्रवासीदिवसातून ३ वेळा स्वच्छतागृह साफ करण्यात येतात. सकाळी ६ वाजल्यापासून कर्मचारी स्वच्छतागृह साफ करण्याचे काम करतात. संध्याकाळच्या वेळी स्वच्छता करण्यास आम्ही थोडं कमी पडतो आहे. ज्या स्वच्छतागृहाची स्वच्छता राहिली असेल, ती लवकर करून स्वच्छतागृह सुरू करण्यात येईल.- गणेश सुनोने, सहायक आयुक्त,वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय

टॅग्स :Puneपुणे