शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात कर्नाटक आंब्याची ' देवगड हापूस' म्हणून विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 17:10 IST

नागरिकांची फसवणूक करणा-या मार्केट यार्डातील तीन अडत्यांवर कारवाई

ठळक मुद्देपरराज्यातील विविध जातीचे आंबे ‘कोकण हापूस' या नावाने विकण्याचे धाडस

पुणे: सद्यस्थितीत आंब्याचा हंगाम सुरु असल्याने कोकणातील रत्नागिरी, देवगड या भागाबरोबरच कर्नाटकातूनही पुण्यात आंबे दाखल होत आहेत. रसाळ आंबे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणातील आंब्यांना सर्वाधिक मागणी असते. म्हणून त्यांच्या किमतीही जास्त असतात. अशाच परिस्थितीत नागरिकांची फसवणूक करत विक्रेते आंब्यांची अदलाबदल करून विक्री करू लागले आहेत. त्यामध्येच पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात कर्नाटक येथून येणार आंबा कोकणातील ‘देवगड हापूस’ या नावाने विकत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी बाजारातील तीन अडत्यांवर कारवाई केली आहे. यामध्ये एच.बी बागवान शेड नं.२, नॅशनल फ्रूट शेड नं.३, लोकमल नारायणदास पंजाबी शेड नं.४ या तीन अडत्याकडून १७,७०० रुपये दंड वसूल केला आहे.

बाजारात आंब्याचा हंगाम बहरला आहे. परंतु अनेक विक्रेते परराज्यातील विविध जातीचे आंबे ‘कोकण हापूस' या नावाने विकण्याचे धाडस करू लागले आहेत. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते. या फसवणुकीस आळा बसण्यासाठी राज्याचे पणन संचालक सतीश सोनी यांनी परिपत्रक काढले आहे. अशा फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईचा आदेश सोनी यांनी राज्यातील बाजार समित्यांना दिला आहे.  त्या पार्श्वभूमीवर गरड यांनी बाजारात आंब्याचा व्यापार करणाऱ्या सर्व अडत्यांना सूचना केल्या होत्या. सोमवारी गेट नं. ७ येथील आंबा बाजाराला गरड यांनी भेट दिली. यावेळी काही अडते कर्नाटक येथून येणार आंबा’  कोकणातील ‘देवगड हापूस’ या नावाने विकत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘देवगड हापूस आंबा’ या नावाच्या पेटीत कर्नाटक येथील आंबा भरून त्यामध्ये तो विकला जात होता. यामुळे गरड यांनी तीन अडत्यांवर कारवाई केली आहे. 

कर्नाटक येथील आंबा ‘देवगड हापूस आंबा’ या नावाच्या पेट्यामध्ये तो विकला जात होता. त्यामुळे पहिल्यांदा पाच हजार रुपये दंड वसुल केला आहे. तसेच दुसऱ्या वेळेस दहा हजार रुपये दंड वसूल केला जाईल. त्यानंतर तसा प्रकार आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.                                                                           - मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे. 

टॅग्स :PuneपुणेfruitsफळेMarketबाजार