शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आंबा रत्नागिरी की कर्नाटक; होतेय फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 03:18 IST

अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मार्केट यार्डमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. या हंगामातील हापूस आंब्याची चव घेण्यासाठी पुणेकर तयारीत असतानाच सध्या मार्केट यार्ड व शहराच्या गल्ली-बोळात आंबे विक्रेत्यांकडून रत्नागिरी, देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकातील हापूस आंब्याची विक्री केली जात आहे.

पुणे -  अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मार्केट यार्डमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. या हंगामातील हापूस आंब्याची चव घेण्यासाठी पुणेकर तयारीत असतानाच सध्या मार्केट यार्ड व शहराच्या गल्ली-बोळात आंबे विक्रेत्यांकडून रत्नागिरी, देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकातील हापूस आंब्याची विक्री केली जात आहे. त्यामुळे आपण विकत घेतलेला आंबा कोकणातला की कर्नाटक, असा प्रश्न सध्या पुणेकरांना पडत आहे. याकडे मात्र बाजार समिती प्रशासन व ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांकडे एफडीएकडूनदेखील दुर्लक्ष केले जात आहे.सध्या आंब्याचा हंगाम जोमात सुरू झाला असून, फळांचा राजा हापूस आंबा अन् त्यातही देवगड, रत्नागिरी हापूस आंबा म्हटल की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. गुलटेकडी येथील मार्केट यार्डमध्ये १० ते ११ हजार पेट्या कर्नाटक हापूसची आवक झाली आहे. तर रत्नगिरी व देवगड हापूसची ४ ते ५ हजार पेट्यांची आवक झाली. त्यामुळे सध्या पुणे शहरातील बाजारामध्ये रत्नागिरी, देवगड हापूस केवळ २० ते ३० टक्केच असून, ७० ते ८० टक्के आंबा हा कर्नाटक हापूस आंबा आहे. येत्या बुधवार (दि.१८) रोजी अक्षय तृतीयाचा मुहूर्त असून, या मुहूर्तावर हंगामातील आंबा खाण्यास सुरुवात करणाºया पुणेकरांची संख्या मोठी आहे. परंतु संध्या कोकणातील हापूसच्या नावाखाली कर्नाटक हापूसची विक्री करून व्यापाºयांकडून पुणेकरांची फसवणूक केली जात आहे.गेल्या दोन-तीन वर्षांत पुणे शहरामध्ये सर्वत्र गल्ली-बोळांत रस्त्यांवर कर्नाटक हापूसची विक्री करणाºया किरकोळ विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. तसेच येथील गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये देखील रत्नागिरी, देवगड हापूसचे केवळ ४ ते ५ होलसेल विक्रेते असून, कर्नाटक आंब्याची विक्री करणारे तब्बल १५ हून अधिक होलसेल व्यापारी आहेत. शहरात व मार्केट यार्डमध्ये देखील कर्नाटक हापूसची विक्रीदेखील सर्रास कोकणचा हापूस नाव असलेल्या बॉक्समध्ये केली जात असल्याने नक्की आंबा कुठला लक्षात येत नाही.रत्नागिरी व कर्नाटक हापूसच्या दरामध्येदेखील मोठा फरकअसतो. सध्या बाजारात रत्नागिरी हापूसचे दर ६०० ते ७०० प्रतिडझन असून, कर्नाटक हापूचे दर ४०० रुपयांपासून ६०० रुपये डझन एवढे आहेत. परंतु कर्नाटक हापूची विक्रीदेखील रत्नागिरीच्याच दराने केली जाते. यामुळे पुणेकरांची दुहेरी फसवणूक सुरू आहे.असा ओळखाकोकणातील हापूसरत्नागिरी, देवगड हापूसची साल पातळ असते. या तयार हापूसचा वरचा भाग केशरी लालसर रंगाचा असतो व पिवळा धमक रंग असतो,आकाराने थोडा गोलसर असा हा कोकणचा हापूस असतो.कोकण हापूस कापल्यावर आतमधून केसरी रंगाचा तर कर्नाटक हापूस कापल्यावर पिवळ््या रंगाचा दिसतो.खात्रीच्या व्यापा-यांकडून खरेदी करावीगेल्या काही वर्षांत पुणे मार्केट यार्डमध्ये कर्नाटक हापूसची आवक वाढत आहे. तसेच या हापूसचा दर्जादेखील काही प्रमाणात सुधारला आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांला आंबा कर्नाटक हापूस आहे की रत्नागिरी हे सहज लक्षात येणे कठीण असते. यामुळेच ग्राहकांची फसवणूक होते. परंतु शहरात रत्नागिरी, देवगड आंब्यांची विक्री करणारे काही ठराविक विक्रेते आहेत. तसेच आपल्या भागातील नेहमीच्या व ओळखीच्या विक्रेत्यांकडून आंबा खरेदी केल्यास फसवणूक टाळता येऊ शकते.- रोहन उरसळ, फळ विक्रेते, मार्केट यार्ड

टॅग्स :MangoआंबाPuneपुणेnewsबातम्या