शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

कर्मयोगी कारखाना स्वयंपूर्ण : हर्षवर्धन पाटील  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 02:26 IST

‘‘अथक प्रयत्नांनंतर कर्मयोगी सहकारी साखर कारखाना स्वयंपूर्ण केला आहे. ऊस उत्पादक सभासद शेतकºयांचे सहकार्य मिळाले तर आगामी काळात यशस्वी वाटचालीत कसलीही अडचण येणार नाही,’’ असा विश्वास माजी मंत्री कर्मयोगी सहकारीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी व्यक्त केला.

इंदापूर : ‘‘अथक प्रयत्नांनंतर कर्मयोगी सहकारी साखर कारखाना स्वयंपूर्ण केला आहे. ऊस उत्पादक सभासद शेतकºयांचे सहकार्य मिळाले तर आगामी काळात यशस्वी वाटचालीत कसलीही अडचण येणार नाही,’’ असा विश्वास माजी मंत्री कर्मयोगी सहकारीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी व्यक्त केला.कर्मयोगी सहकारी कारखान्याच्या ३२व्या वार्षिक सर्वसाधारणसभा रविवारी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. या वेळी उपाध्यक्षा पद्मा भोसले, मयूरसिंह पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक बी. जी. सुतार यांच्यासह सर्व संचालक मंडळ या वेळी उपस्थित होते. म.फुले विद्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा झाली.हर्षवर्धन पाटील म्हणाले की, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने कधी कुणाचा रुपयादेखील बुडविला नाही. असंंख्य अडचणींवर मात करत केवळ ऊसउत्पादक सभासद, कारखान्याचे कर्मचाºयांच्या पाठबळावर मार्ग काढत आलो. आजघडीला कारखान्याचे विस्तारीकरण व इतर सर्व अनुषंगिक बाबींची पूतर्ता करण्यात आलीआहे. येथून पुढे कोणतीही अडचण राहणार नाही. कर्जासाठी कुणापुढे पदर पसरावा लागणार नाही.इतकी उत्तम परिस्थिती आहे. यंदा १३ लाख मेट्रिक टनाच्या पुढे ऊस गाळप होणे आवश्यक आहे. त्यासाठी सन २०१७-१८ व २०१९ हे दोन्ही गळीत हंगाम नियोजनबद्धरीत्या पार पाडण्याची शपथ सर्वांनी घेतली पाहिजे.सन २०१०-११मध्ये कारखान्याची स्थिती चांगली होती. त्या वेळी आपण २ हजार ६११ रुपये दर दिला होता. तीन वेळा कारखान्याची गाळप क्षमता वाढविली होती. दुर्दैवाने दुष्काळी स्थिती निर्माण झाली. गाळप कमी व उत्पादन खर्च वाढला होता. सन २०१४मध्ये राजकीय सत्ताबदल झाला.मागील वर्षी ३१ वर्षांतील नीचांकी गाळप झाले. मात्र जाहीर केल्याप्रमाणे २ हजार ५०५ ऊसदर दिला. कामगारांच्या पगारासाठी वर्षाला १९ कोटी रुपयेलागतात. त्याची तजवीज करून ठेवली होती. तथापि काही बँकांनी जाणीवपूर्वक अडचणी निर्माण केल्या. सन २०१८चे हप्ते बँकांनी २०१७च्या ३१ मार्चमध्ये कपात करून घेतले होते.सध्या वेळेवर पगार होण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत. कारखाना क्षेत्रातील उसाला साडेनऊ रिकव्हरी बसते आहे. साडे अकरापर्यंत रिकव्हरी मिळण्यासाठी संचालक मंडळ व आपण सारे प्रयत्न करणार आहोत, असे सांगून ते म्हणाले,की दररोज १२ हजार टनाचे गाळप होईल अशी तयारी कारखान्याने केली आहे. सूत्रसंचालन शरदकाळे यांनी, तर आभार राहुल जाधव यांनी मानले.शेतकºयांना एफआरपी पेक्षा ४६३ रुपये जादाकर्मयोगीने शेतकºयांना एफआरपीपेक्षा ४६३ रुपये जादा दिले आहेत. त्या जादा रकमेवर इन्कम टॅक्स आकारला गेला आहे. सभासदांना तर २ हजार ५०५ रुपयेप्रमाणे पैसे दिले आहेत. या संदर्भात येणाºया अडचणी सर्वांनी एकत्रितपणे सोडविल्या पाहिजेत, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

टॅग्स :Puneपुणे