शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्धर आजारांनी ग्रस्त महिलेला कन्यारत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 13:08 IST

ससून रुग्णालयामध्ये मनोविकारशास्त्र विभागात आॅक्टोबर महिन्यात ३६ वर्षीय महिला उपचारासाठी दाखल झाली. त्यावेळी ती चार महिन्यांची गर्भवती होती. प्रसूतीच्या काळात एकाच वेळी तीन आजार असल्याने महिलेच्या व बाळाच्या जिवालाही धोका होता.

ठळक मुद्देदुर्मिळ घटना : ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी पेलले आव्हान 

पुणे : एकाच वेळी तीन आजारांनी ग्रस्त असलेल्या गर्भवती महिलेची सुरक्षित प्रसूती करण्यात ससून रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. तीनही आजारांचे उपचार करण्याबरोबरच आई आणि बाळाला सुरक्षित ठेवण्याचे आव्हान डॉक्टरांसमोर होते. प्रसूतीनंतर दोघांनाही सध्या कोणताही धोका नाही. ससून रुग्णालयामध्ये मनोविकारशास्त्र विभागात आॅक्टोबर महिन्यात ३६ वर्षीय महिला उपचारासाठी दाखल झाली. ती चार महिन्यांची गर्भवती होती. तिला २० वर्षांपासून पॅरेनॉईड स्क्रिझोफे्रनिया हा आजार आहे. त्यासाठी तिला विविध प्रकारच्या गोळ्या सुरू होत्या. ‘इलेक्ट्रोकन्वलझिव्ह थेरपी’ (ईसीटी) ही उपचार पद्धतीही वापरण्यात आली. मात्र, त्याचा फारसा परिणाम होताना दिसला नाही. त्यामुळे गोळ्यांचे प्रमाण वाढवावे लागले. हे उपचार सुरू असतानाच महिलेच्या गर्भाशयाच्या पिशवीला गाठी (फायब्रॉईड) असल्याचे निदान झाले. त्यानंतर मधुमेह आजारानेही तिला ग्रासले. त्यातच या महिलेचे वयही जास्त असल्याने धोका अधिक होता. लग्नानंतर दहा वर्षे त्यांना मूल होत नव्हते.असा पहिलाच रुग्ण रुग्णालयात दाखल झाला होता. हे अत्यंत दुर्मिळ असल्याने डॉक्टरांसमोर मोठे आव्हान होते. प्रसूतीच्या काळात एकाच वेळी तीन आजार असल्याने महिलेच्या व बाळाच्या जिवालाही धोका होता. त्यामुळे नातेवाइकांना काळजी लागली होती. त्यांनी सुरुवातीला गर्भपात करण्याची सूचना केली होती. मात्र, रुग्णालयातील मनोविकार विभागासह स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र विभागातील सर्व डॉक्टर्स व सहकाऱ्यांनी अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू ठेवून नातेवाईकांना आधार दिला. मागील आठवड्यात महिलेने सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे मुलीला जन्म दिला. दोघींचेही आरोग्य चांगले आहे. डॉ. शिल्पा नाईक, डॉ. अरुण अंबडकर, डॉ. दीपाली जाधव, डॉ. पी. डब्ल्यू. सांबरे, डॉ. मनजित संत्रे आणि सहकाºयांनी हे आव्हान यशस्वीपणे पेलले. 

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलdocterडॉक्टर