शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Pune: कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये वीज नाही, जनरेटरही खराब; PMC चा भोंगळ कारभार

By निलेश राऊत | Updated: May 20, 2023 12:54 IST

गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे...

पुणे : सर्वसामान्य पुणेकरांना वैद्यकीय उपचारासाठी आशेचा किरण असलेल्या महापालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलला कोणी वाली राहिलेला नाही. आज वीज गेली असता, हॉस्पिटलमधील जनरेटरही काम करत नसल्याचे समोर आले. यामुळे रुग्णालयात शेकडो रुग्णांचे हाल झाले.

गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. अशा वेळी हॉस्पिटलमध्ये तरी पर्यायी व्यवस्था व्यवस्थित कार्यान्वित आहे की नाही हे तपासणे महापालिकेच्या विद्यूत विभागाचे काम आहे. पण आजपर्यंत कमला नेहरू हॉस्पिटलकडे या विभागाचे दुर्लक्षच झाले आहे. रुग्णालयातील एका लिफ्टचे कामही कित्येक दिवस त्यांना करता आले नाही. शनिवारी तर हद्दच झाली या हॉस्पिटलमध्ये जुन्या इमारतीचा विजेचा पुरवठा खंडित झाला. परिणामी डायलिसिस सेंटर, ऑपरेशन थिएटर, लहान मुलांचा १६ नंबर वॉर्ड, १७ व १८ नंबर ओपीडी एवढेच काय तर हृदयरोग विभागाचीही वीज सकाळी सव्वा दहा पासून बंद आहे. या विभागात आयसीयु मध्ये रुग्ण आहेत.

विशेष म्हणजे या हॉस्पिटलमध्ये जनरेटर आहे पण त्याची वायर जळल्याने तोही नादुरुस्त होता. यामुळे तीन तासांहून अधिक काळ हॉस्पिटलमध्ये वीज पुरवठा होऊ शकला नाही. महापालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे मात्र रुग्णांचे हाल झाले. 

कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये वीज पुरवठा खंडित झाला असला तरी तो पूर्वरत केला जात आहे. विजेची वाढती मागणी व उष्णता यामुळे काही तांत्रिक अडचणी आल्या असल्या तरी त्या दूर करून विद्युत पुरवठा सुरळीत केला जात आहे.

-श्रीनिवास कंदुल (विद्युत विभाग प्रमुख, महापालिका)

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड