वाघाळे : वाघाळे येथे लोंबलेल्या वीजवाहक तारांचा स्पर्श होऊन एका ट्रॅक्टरमधील कडब्याला आग लागल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली.विलास मापारे हे शेतकरी वरूडे येथून ज्वारीचा कडबा घेऊन टाकळी भीमा येथे निघाले होते. मात्र, वाघाळे येथे रांजणगाव रस्त्यावर लोंबलेल्या तारांचा संबंधित ट्रॅक्टरचालकाला रात्रीच्या अंधारात अंदाज न आल्याने ट्रॅक्टरमधील सुमारे पाच हजार कडबा जळून खाक झाला. नशीब बलवत्तर चालकाने प्रसंगावधान राखून टँक्टर वेळीच बाजूला घेतल्याने पुढील अनर्थ टळला. कारण, नेमक्या लोकवस्तीतच हा प्रकार घडल्याने नागरिक भयभीत झाले होते. दरम्यान, या घटनेचा पंचनामा करून वीज वितरण कंपनीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मापारे यांनी केली आहे. (वार्ताहर)
ट्रॅक्टरमधील कडबा जळाला
By admin | Updated: February 14, 2017 01:33 IST