शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

जुन्नरच्या आमराईला सातवाहनकालीन वारसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:09 IST

अशोक खरात लोकमत न्यूज नेटवर्क खोडद : जुन्नर तालुक्यातील आंब्याची गोडी सातवाहनकालीन काळापासून आजही कायम आहे. त्या काळातही तालुक्यातील ...

अशोक खरात

लोकमत न्यूज नेटवर्क

खोडद : जुन्नर तालुक्यातील आंब्याची गोडी सातवाहनकालीन काळापासून आजही कायम आहे. त्या काळातही तालुक्यातील आंब्यांना मोठी मागणी होती. याबाबतचे दस्तावेज आढळले आहे. या सोबतच मुगल सम्राट औरंगजेबला पाठविलेल्या पत्रातदेखील जुन्नर तालुक्यातील आंब्यांचा केलेला उल्लेख आढळतो. इतक्या वर्षांनंतरही जुन्नरच्या आंब्यांची गोडी आजही जशीच्या तशी आहे. उत्कृष्ट चव असलेल्या या आंब्यांना बाजारपेठेत विशेष मागणी आहे.

जुन्नर तालुक्यातील हापूस आंबा जून महिन्यात विक्रीसाठी बाजारपेठेत येतो. या भागात आजही ५० ते ७० वर्षे वयाच्या हापूस आंब्याच्या चांगल्या उत्पादक बागा आहेत.

जुन्नर तालुक्यात प्रामुख्याने येणेरे, तांबे, काले, दातखिळवाडी, पारुंडे, वैष्णवधाम, निरगुडे, बोतार्डे, शिंदे राळेगण, खामगाव, माणिकडोह, बेलसर, चिंचोली, वडज, सुराळे, वाणेवाडी,धालेवाडी, कुसुर, गोद्रे, काटेडे, तेजुर, पुर, शिरोली, कुकडेश्वर इत्यादी गावांमधील शेतकरी आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. या भागातून येणारा आंबा उशिरा येणारा असला, तरी हा आकाराने मोठा असतो. या भागातील माती आणि हवामानामुळे या आंब्याची उत्कृष्ट चव लागते.

सन १६१० मध्ये मलिक अंबरने जुन्नरला राजधानी करून विविध फळफळावळींचा विकास केला. हबशी सरदार मलिक अंबर याने जुन्नरच्या पूर्वेला एक टोलेजंग महाल बांधून परिसरात आंबे लावले होते. या बागेला पाणीपुरवठा करण्यासाठी जवळच मातीचा बांध घालून बादशाहा तलाव बांधला. म्हणूनच कालांतराने हा भाग हापूस बाग (आफिजबाग) म्हणून ओळखला जाऊ लागला. काही भाग अमरापूर म्हणून नोंद आहे.

मोगल कालखंडात जुन्नर प्रांतात औरंगजेब बादशहाची ३५० झाडांची सरकारी आमराई होती. अशी सेतू माधवराव पगडी लिखित 'मोगली दरबारातील बातमीपत्र' या ग्रंथात नोंद असल्याचे इतिहास संशोधक प्रा. लहू गायकवाड यांनी सांगितले.

मूहरमखान हा फळफळावळांचा आणि सरकारी बागांचा दारोगा (व्यवस्था पाहणारा) होता. त्याने औरंगजेबला पत्राद्वारे जुन्नरमधील आंब्यांविषयी पुढीलप्रमाणे कळविले, ‘जुन्नर परगण्याजवळ इरसाली आंब्याची साडेतीनशे झाडे आहेत. आता झाडांना मोहर आला आहे. या झाडांची निगा राखण्यासाठी कोणाची तरी नेमणूक व्हावी.’ यावर औरंगजेब बादशहाने कळविले की, ‘आंबे तयार झाल्यावर काळजीपूर्वक पाठवावेत. जुन्नरसाठी रहमतुल्ला यास पाठविले आहे. आंब्याचा मोहर गळू नये यासाठी काळजी घ्यावी. यावरून जुन्नरचा आंबा औरंगजेबाच्या दरबारी जात होता हे स्पष्ट होते. तसेच या आंबा बागेवर खुद्द औरंगजेबाचेही जातीने लक्ष होते हे ही जाणवते.

चौकट

जुन्नर तालुक्यातील हापूसचा काढणी हंगाम सुरू झाला आहे. तालुक्यात ७५० हेक्टर क्षेत्रात आंबा लागवड करण्यात आली आहे. यापैकी ८० टक्के क्षेत्र हे पश्चिम भागात आहे. सह्याद्रीत डोंगररांगा आणि उपरांगामुळे या भागातील हवामान आंबा लागवडीसाठी पोषक आहे. किल्ले शिवनेरीच्या परिसरात ऐतिहासिक काळापासून आंबा लागवड केली जात होती.या आंब्याला असणारी वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण चव यामुळे या आंब्याचा आज वेगळा ग्राहक वर्ग तयार झाला आहे. या भागातील शेतकरी कमीत कमी कीटकनाशकांचा वापर करून आंब्यांचे उत्पादन घेत आहेत

- सतीश शिरसाठ, तालुका कृषी अधिकारी, जुन्नर

चौकट

जुन्नर परिसरातील आंबा लागवडीचा इतिहास हा सातवाहन काळापासून म्हणजे २ हजार वर्षांपासून सुरू होतो. आंब्याची ओळख चिनी प्रवासी ह्यु - एन-त्संग याने भारताला करून दिली असे म्हणतात. पण या अगोदर सहाशे वर्षे सातवाहन साम्राज्यातील 'गाथा सप्तशती' मध्ये या आंब्याबाबत अनेक गाथांमध्ये स्पष्ट उल्लेख आहे. पोर्तुगीजांनी गोव्यात हापूस लागवड करण्याच्या आधीपासूनच जुन्नर मध्ये इरसाल, कलमी, रायवळ या जातीचे आंबे होते याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. - प्रा. डाॅ. लहू गायकवाड,

पदव्युत्तर ईतिहास संशोधन केंद्र , कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नारायणगाव

फोटो : जुन्नर तालुक्यातील राळेगण येथील नाथा भागूजी उंडे पाटील यांच्या बागेतील ५४ वर्षे वयाचे हापूस आंब्याचे झाड.