शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मुठा नदीत जीवघेण्या कसरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 02:19 IST

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहर व परिसरात चांगला पाऊस होत आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस होत असल्याने पुण्यातील अनेक धरणे भरली आहेत. खडकवासला धरणातून मोठा विसर्ग मुठा नदीपात्रात करण्यात येत आहे. त्यामुळे मुठा नदी दुथडी भरुन वाहत आहे. या पाण्यात काही तरुण धोकादायकरीत्या पोहत आहेत. त्याचबरोबर या मुलांसोबत काही ...

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहर व परिसरात चांगला पाऊस होत आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस होत असल्याने पुण्यातील अनेक धरणे भरली आहेत. खडकवासला धरणातून मोठा विसर्ग मुठा नदीपात्रात करण्यात येत आहे. त्यामुळे मुठा नदी दुथडी भरुन वाहत आहे. या पाण्यात काही तरुण धोकादायकरीत्या पोहत आहेत. त्याचबरोबर या मुलांसोबत काही लहान मुलेही नदीच्या पाण्यात उतरत आहेत. परिणामी त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

पुण्यातील सर्वच धरणे जवळपास पूर्ण भरली आहेत. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे नदी दुथडीभरुन वाहत आहे. गेल्या काही दिवसांत खडकवासला धरणातून पाणी सोडल्याने पुण्यातील महत्त्वाचा असा भिडे पूल अनेकदा पाण्याखाली गेला होता. त्यामुळे पोलिसांनी या पुलावरील वाहतूक बंद केली होती. मुठा नदीला लागून असलेल्या दत्तवाडी भागातील काही तरुण आणि चिमुकले हे मुठा नदीच्या पाण्यात धोकादायकरीत्या पोहत असतात. पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने तसेच पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने एखादा अपघात घडण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी एक लहानगा पाणी वाहत असलेल्या एका छोट्या पूलावरुन सायकल चालवत असल्याचे समोर आले होते. त्याचबरोबर अनेक महाविद्यालयीन तरुण-तरुणी नदीपात्राजवळ जात पाण्याजवळ सेल्फी घेत असल्याचेही समोर आले होते. खडकवासला धरणातून नदीमध्ये पाणी सोडल्यावर नदीपात्राजवळ कोणी जाऊ नये असे आवाहन पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात येते, परंतु काही तरुणांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येते.नदीत उतरणे धोकादायक

महिन्याभरापूर्वी संगमवाडी येथे एक चिमुकला नदीपात्रात सायकल चालवित असताना पाण्यात बुडाला होता. दोन दिवसांनी त्याचा मृतदेह दूरवर आढळला होता. पावसाळ्यात नदीत उतरणे धोकादायक असताना याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Puneपुणेriverनदी