आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील रसाळ आंब्याला भाव मिळणार, यंदा एक महिना अगोदर आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:04 PM2021-05-11T16:04:01+5:302021-05-11T16:04:10+5:30

मेच्या पहिल्याच आठवडयात हा आंबा पिकू लागला

Juicy mangoes from Ambegaon, Junnar taluka will get price, arrival a month earlier this year | आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील रसाळ आंब्याला भाव मिळणार, यंदा एक महिना अगोदर आगमन

आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील रसाळ आंब्याला भाव मिळणार, यंदा एक महिना अगोदर आगमन

Next
ठळक मुद्देहवामानातील बदल व मागील वर्षी झालेल्या चक्रीवादळामूळे यावर्षी आंबे लवकर पिकायला सुरुवात

घोडेगाव: दरवर्षी जुन्नर तालुक्यातील रसाळ आंबा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पिकायला सुरुवात होते. यंदा मेच्या पहिल्याच आठवडयात पिकू लागला आहे.  हवामानातील बदल व मागील वर्षी झालेल्या चक्रीवादळामुळे असे झाले आहे. लवकर आंबा पिकू लागल्याने कोकणातील देवगड व रत्नागिरी प्रमाणेच आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील आंब्याला भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना वाटत आहे. 

दरवर्षी कोकणातील आंबा संपल्यावर येथील आंबा पाडाला लागण्यास सुरुवात होते. त्यात मे अखेर व जुनच्या पहिल्या आठवडयात पडणा-या वळवाच्या पावसामुळे या आंब्याचे मोठे नुकसान होते. त्यातूनही उरलेल्या आंब्याला भाव मिळत नाही. त्यामुळे आंबेगाव, जुन्नर या भागातील आंब्याला रंग, चव असूनही दुर्लक्षित राहिला आहे. 

जुनच्या दुस-या आवडयात पिकणारा आंबा मेच्या पहिल्याच आठवडयात पिकू लागल्याने अनेक शेतकरी आश्चर्यचकित झाले आहेत. यावर्षी थंडी व गरमी यातील चढउतारामुळे एका झाडाला तीन ते चार वेळा मोहोर आले. तसेच अधूनमधून पडणारा पाऊस याचाही परिणाम झाडांवर झाला. मागील वर्षी ३ जूनला झालेल्या चक्रीवादळामुळेही झाडांमध्ये बदल होऊन लवकर आंबा पिकला असल्याचे शेतीतज्ञ संतोष सहाणे यांनी सांगितले.  

शेतकरी राम ढोले म्हणाले,  यावर्षी लवकर आंबा पिकू लागल्याने कोकणातील देवगड व रत्नागिरी प्रमाणेच आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील आंब्याला भाव मिळेल अशी आशा वाटत आहे. आंबा पाडाला लागल्याने काढून आढी लावायला सुरवात केली असून लवकरच आमचा आंबा मुंबईच्या बाजारपेठेत आंबा जाईल.   

Web Title: Juicy mangoes from Ambegaon, Junnar taluka will get price, arrival a month earlier this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.