शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पत्रकारांनी अंकुश म्हणून काम करावे - चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 04:18 IST

देशाच्या विकासामध्ये प्रत्येकाने आपापली भूमिका योग्यपणे बजावली तर देशाच्या विकासास वेळ लागणार नाही. देशाच्या विकासाच्या दिशेने सुरू असलेल्या घोडदौडीमध्ये पत्रकारांची भूमिका ममत्वाची असून पत्रकारांनी अंकुश म्हणून काम करणे आवश्यक आहे.

पुणे : देशाच्या विकासामध्ये प्रत्येकाने आपापली भूमिका योग्यपणे बजावली तर देशाच्या विकासास वेळ लागणार नाही. देशाच्या विकासाच्या दिशेने सुरू असलेल्या घोडदौडीमध्ये पत्रकारांची भूमिका ममत्वाची असून पत्रकारांनी अंकुश म्हणून काम करणे आवश्यक आहे. तसेच या अंकुशाबरोबर भीती ही असलीच पाहिजे. मात्र, पत्रकारिता हे एक भयानक प्रकरण असल्याने सांभाळून आणि कमी बोला, अशी स्थिती निर्माण झाली तर ही चिंताजनक बाब असेल, असे मत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जर्नालिस्ट वृत्तवाहिनी स्टुडिओचे व पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या शुभारंभ सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते. याप्रसंगी पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया मान्यवरांचा गौरव करण्यात आला. माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, गोविंद घोळवे, राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे, अभिनेता राहुल सोलापूरकर, विश्वासराव आरोटे आदी उपस्थित होते.‘लोकमत’चे औरंगाबाद आवृत्तीचे अनिल भापकर यांच्यासह प्रा. सी. एन. चौधरी, आशिष घुमे, सोमनाथ काळे, प्रा. आनंद सुराणा आदींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पाटील म्हणाले, ‘‘अलीकडच्या काळात केवळ घडणाºया घटनांच्याच बातम्या दिल्या जातात. मात्र, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ तासांत पश्चिम महाराष्ट्रात ३ कार्यक्रम का घेतले? त्यांनी या भागातील निवडक संस्थांनाच भेटी का दिल्या? एखाद्या सदस्याने विधान परिषदेचा राजीनामा दिल्यानंतर चार ते पाच महिन्यांनंतर घेतली जाणारी निवडणूक एक ते दीड महिन्यातच का घेतली जात आहे? याचे कारण मीडियाने शोधण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. त्यामुळे पत्रकारांनी केवळ रोजच्या घडामोडींकडेच लक्ष न देता शोधपत्रकारिता करावी.’’खांडेकर म्हणाले, ‘‘सध्या डिजिटल युगाचा काळ असून वेब चॅनलचे महत्त्व वाढताना दिसत आहे. अलीकडचा प्रेक्षकवर्ग डिजिटल माध्यमाकडे वळत चालला आहे. दूरसंचावर बातम्या पाहणाºया प्रेक्षकांचा विचार केला तर मोबाईलवर बातम्या पाहणाºयांची संख्या वाढत चालली आहे. तसेच ज्यांना दीर्घ काळ पत्रकारिता करायची आहे. त्यांनी स्वत:मध्ये बदल करून डिजिटल पद्धतीचा अवलंब करावा.’’विजय बाविस्कर यांनी पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. संजय भोकरे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. उमेश कुलकर्णी, नवनाथ जाधव, संदीप भटेवरा यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकाºयांनी संयोजन केले.राणे दुसºया क्रमांकाचे मंत्री होऊ शकणार नाहीतमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील आहेत, तोपर्यंत नारायण राणे हे दुसºया क्रमांकाचे मंत्री होऊ शकणार नाहीत, अशी टीका पतंगराव कदम यांनी केली. तसेच भारतीय जनता पक्षाने भाषण, आश्वासने आणि मीडिया या तिघांमुळे हे राज्य घेतले, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी याप्रसंगी केली.त्याचप्रमाणे सत्ता येते जाते. परंतु, सत्तेत राहून आपण किती जणांना मदत करतो. त्यावर प्रत्येकाने लक्ष केंद्रित केले पाहिजे. तसेच गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान झपाट्याने बदलत चालले असून त्याचा अंगीकर केला पाहिजे, असेही कदम यांनी नमूद केले.

टॅग्स :Puneपुणे