शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत आणि व्हिस्पर चॉईस यांचा संयुक्त उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 01:26 IST

पुणे : ‘ते चार दिवस’ तर प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येतात. ही गोष्ट प्रत्येक स्त्रीच्या जीवनाचा अविभाज्य भाग असला, तरी सुरुवातीला त्यामुळे ती बावरून, गोंधळून तर कधी घाबरून गेलेली असते.

पुणे : ‘ते चार दिवस’ तर प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येतात. ही गोष्ट प्रत्येक स्त्रीच्या जीवनाचा अविभाज्य भाग असला, तरी सुरुवातीला त्यामुळे ती बावरून, गोंधळून तर कधी घाबरून गेलेली असते. या विषयावर मनमोकळेपणाने बोलायचे कुणाशी, हा प्रश्नही तिला कायम पडलेला असतो. अनेकदा आई आणि मुलीमध्येही या विषयावर मोकळेपणाने संवाद होऊ शकत नाही. त्यामुळेच ‘लोकमत’ आणि व्हिस्पर चॉईस यांनी पुढाकार घेतला आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीसाठी ‘घे उंच भरारी’ उपक्रम आयोजित केला.शनिवारी राजीव गांधी अ‍ॅकॅडमी आॅफ ई-लर्निंग येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे जणू प्रत्येक मुलीला आपल्या आकांक्षांकडे उंच भरारी घेण्याचे पाठबळच मिळाले.अनेकदा या विषयावर पुरेशी माहिती न मिळाल्यामुळे मुली आपल्या समवयस्क मैत्रिणींकडून जाणून घेण्याचा प्रयत्न क रतात; पण अनेकदा ही माहिती अर्धवट आणि अतिरंजित असल्यामुळे मुली अधिकच गोंधळात पडतात. ‘घे उंच भरारी’ या कार्यक्रमामुळे या नाजूक विषयावर संवाद साधण्यासाठी प्रत्येक आई आणि मुलीला एक मंच मिळाला आणि एकेका प्रश्नाची उकल होऊन मुलींच्या मनातील सर्व शंका दूर झाल्या. या वेळी डॉ़ सुनीता काळे व जयश्री शिदोरे यांनी महिला व मुलींशी मनमोकळेपणाने संवाद साधला़जयश्री बागुल, राणी भोसले, दिशा माने यांनी मुलींना आणि महिलांना या विषयावर मार्गदर्शन करून व्हिस्परसंगे उंच भरारी घेण्याची प्रेरणा दिली. व्हिस्परच्या प्रतिनिधी हर्षा पाटील यानी मासिक पाळीदरम्यान पॅड कसे वापरावे, याची प्रात्यक्षिकासह माहिती दिली़आजच्या स्पर्धेच्या काळात मासिक पाळीमुळे मुलींची शाळा बुडण्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. मासिक पाळीच्या काळातही मुलींना शाळेत आत्मविश्वासाने वावरता येण्यासाठी व्हिस्पर चॉईस वापरणे किती महत्त्वाचे आहे, हे एव्हीद्वारे दाखविण्यात आले. या काळात मुलींच्या मनावर सतत दडपण असते. त्या तणावग्रस्त असतात. या उपक्रमामुळे या सगळ्या समस्यांवर चपखल उपाय सापडला, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया अनेक महिलांनी व मुलींनी दिली आणि या उपक्रमाच्या आयोजनाबाबत ‘लोकमत’ आणि व्हिस्पर चॉईसचे मनापासून कौतुक केले.आता व्हिस्पर चॉईस वापरल्यामुळे आपल्या मुलींची शाळा चुकणार नाही व तिच्या स्वप्नांना भरारी मिळणार, यावर सगळ्यांचेच एक मत झाले. अशा प्रकारचे कार्यक्रम महाराष्ट्रभर राबवून व्हिस्पर चॉईस जास्तीत जास्त मुलींना या विषयावर सक्षम करण्यात प्रयत्नशील आहे. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व महिलांना आणि मुलींना व्हिस्पर चॉईसच्या सॅम्पलचे मोफत वाटप करण्यात आले़>‘घे उंच भरारी’ या उपक्रमाद्वारे महिलांना आणि मुलींना मनमुराद बागडण्यासाठी एक मंच मिळाला होता. याचा पुरेपूर फायदा घेऊन कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुलींसाठी दोरीवरच्या उड्या, फुगड्या अशा स्पर्धा घेण्यात आल्या. या दोन्ही स्पर्धांना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

टॅग्स :Puneपुणे