पशुआरोग्यावर होणार संयुक्त परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:24 IST2021-09-02T04:24:06+5:302021-09-02T04:24:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्र सरकारची उत्तर प्रदेशमधील केंद्रीय पशुआरोग्य संशोधन संस्था व राज्याचे नागपूरमधील पशू व मत्स्य ...

Joint conference on animal health to be held | पशुआरोग्यावर होणार संयुक्त परिषद

पशुआरोग्यावर होणार संयुक्त परिषद

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : केंद्र सरकारची उत्तर प्रदेशमधील केंद्रीय पशुआरोग्य संशोधन संस्था व राज्याचे नागपूरमधील पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांची संयुक्त परिषद पुढील आठवड्यात होते आहे. शेतकऱ्यांना पशुपालन करताना येणाऱ्या अडचणींवर या परिषदेत विचारमंथन होणार आहे.

पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाने या परिषदेचे आयोजन केले आहे. अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी ही माहिती दिली. देशात, तसेच परदेशात पशुपालन तसेच पशूंवर वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन होते आहे. गेल्या काही वर्षांत या क्षेत्रात अनेक शोध लागले. दुर्दैवाने त्याचे आदानप्रदान होत नसल्याने शेती करताना ज्यांचा जनावरांबरोबर जास्तीजास्त संबध येतो त्यांच्यापर्यंत हे संशोधन पोहोचतच नाही. तसे होऊ नये यासाठी ही ऑनलाईन परिषद आयोजित करण्यात आली आहे.

पशुसंवर्धन विभागाला यात ग्रामीण भागातील पशुपालकांच्या काय अडचणी आहेत व त्यावर काय उपाययोजना करता येईल यात रस आहे असे स्पष्ट करून डॉ. परकाळे म्हणाले, ‘साथीच्या आजारांपासून बचाव कसा करायचा, नैसर्गिक आपत्तीमध्ये जनावरांची काळजी कशी घ्यायची असे विषय आम्ही संशोधकांसमोर उपस्थित करणार आहोत, तसेच या क्षेत्रातील कोणते संशोधन शेतकऱ्र्यांना उपयोगी पडेल यावरही परिषदेत चर्चा होईल.’

दोन्ही संस्था या क्षेत्रातील प्रतिष्ठित आहेत. त्याचे बरेच संशोधक या परिषदेत सहभागी होतील असे डॉ. परकाळे यांनी सांगितले.

Web Title: Joint conference on animal health to be held