शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
3
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
4
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
7
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
8
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
9
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
10
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
11
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
12
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
13
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
14
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
15
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
16
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
17
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
18
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
19
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
20
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...

नोकरीच्या आमिषाने बँकॉकला बोलावून ४० लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 21:26 IST

कॅनडा, लॅकविया, युरोप, दक्षिण कोरिया या ठिकाणी नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून बँकॉकला बोलावून घेऊन १६ जणांना नोकरी न लावता तब्बल ४० लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. 

पुणे : कॅनडा, लॅकविया, युरोप, दक्षिण कोरिया या ठिकाणी नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून बँकॉकला बोलावून घेऊन १६ जणांना नोकरी न लावता तब्बल ४० लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी संजयकुमार, नेहा, जोया, जितेंद्र अशी नावे असलेल्यांवर गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी जोनाकुमार आनंदराव डोक्का (वय ३६, रा. गंगा लोटस, उंड्री) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोक्का यांची ग्रेस कनक्ट फ्री लान्सर या नावाची प्लेसमेंट कन्सल्टन्सी आहे़ त्या २०१४ पासून वेगवेगळ्या कंपन्यांना कामगार पुरविण्याचे काम करतात. एप्रिल २०१७ मध्ये त्यांना नेहा नावाने फोन आला. दिल्लीतील अजय ट्रु व्हिसा प्लेसमेंट कंन्सल्टन्सी कंपनीतून बोलत असून आमच्याकडे दक्षिण कोरिया, लॅटव्हिया, युरोप, कॅनडा या ठिकाणी सर्व प्रकारच्या कामगारांच्या जागा आहेत. तुमच्याकडे कोणी अर्ज केले आहेत का, अशी विचारणा केली. त्यानंतर मूळमालक संजयकुमार याने आम्ही सर्व प्रोसिजर बँकॉक येथून करतो. सध्या मी बँकॉक अ‍ॅम्बसीत कामाला असून सर्व प्रोसिजर पूर्ण करायला १० ते १५ दिवस लागतील. त्यासाठी कामगारांना बँकॉकला यावे लागेल. त्याप्रमाणे डोक्का यांनी १२ कामगारांची माहिती पाठविली. प्रत्येक कामगाराला ३ लाख ५० रुपये प्रोसेसिंग फी, येण्या-जाण्याचे तिकीट व बँकॉलला आल्यावर राहणे व जेवण, व्हिसा प्रोसेजसाठी १ हजार यूएस डॉलर द्यावे लागतील, असे सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी प्रथम ४ कामगारांना बँकॉकला पाठविले. पण १ हजार डॉलर घेऊनही त्यांची काहीही सोय न झाल्याने शेवटी ते लोक परत भारतात आले. त्यानंतर डोक्का यांनी संजयकुमार यांच्याकडे तक्रार केल्यावर त्यांनी आता मी स्वत: व्यवस्था करतो असे सांगितले. त्यानंतर डोक्का या आणखी १२ कामगारांना घेऊन बँकॉकला गेल्या. त्यांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या बँक खात्यात प्रत्येक कामगारांचे ३ लाख ५० हजार रुपये भरले. त्यांनी स्वत: अडीच लाख रुपये भरले. पण तीन दिवसात त्यांचे काम झाले नाही. त्यांना भारतात परत येण्याचे तिकीट रद्द करायला लावले. १९ मे २०१७ रोजी ते राहत असलेल्या हॉटेलवर त्यांचे पासपोर्ट पाठवून दिले. त्यावर ज्या देशात नोकरी लावणार होते, त्या देशाचा व्हिसा शिक्का नव्हता. त्यांनी संजयकुमार याला विचारल्यावर माझ्याकडे तुमचे पैसे असून तुम्ही भारतात परत जा. मी पैसे परत करेन किंवा आॅनलाइन व्हिसा करून देईन, असे आश्वासन दिले. परंतु, त्यांनी एकही पैसा परत न करता किमान ४० लाख रुपयांची फसवणूक केली. डोक्का यांनी अगोदर सायबर क्राईम शाखेकडे तक्रार अर्ज केला होता. तेथून तो कोंढवा पोलीस ठाण्यात आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :MONEYपैसा