शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

साड्या देण्याच्या आमिषाने लांबवले दागिने

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 02:19 IST

महिलेस लुटले : महात्मा फुले पेठेमध्ये चोरट्याने केली हातचलाखी

पुणे : कामाच्या शोधात निघालेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेला काम देण्याच्या बहाण्याने तसेच साड्या देण्याच्या आमिषाने एका चोरट्याने गंडविले. या महिलेच्या अंगावरील सोने रुमालात बांधून देताना हातचलाखी करुन हे दागिने लंपास करण्यात आले. ही घटना गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास महात्मा फुले पेठेमध्ये घडली. खडक पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट््याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे. ही महिला भवानी पेठेमध्ये राहते. त्या धुण्याभांड्याची तसेच आया म्हणून काम करतात. गुरुवारी दुपारी त्या कामाच्या शोधात निघालेल्या असताना आरोपीने त्यांना गाठले. त्यांची विचारपूस केली. त्या वेळी या महिलेने आपण कामाच्या शोधात असल्याचे सांगितले. आरोपीने त्यांना माझ्या ओळखीच्या एक भाभी आहेत. त्या भाभी साड््या वाटत आहेत. आपणास त्यांच्याकडून काम आणि साडी मिळवून देतो असे सांगितले. त्यांना घेऊन आरोपी महात्मा फुले पेठेतील पितृछाया बिल्डिंगमध्ये घेऊन गेला. त्यांना पहिल्या मजल्यावर जाऊन भाभी यांना भेटण्यास सांगितले. दरम्यान, त्याने पार्किंगमध्येच त्यांना अंगावरील दागिने काढून देण्यास सांगितले. आपल्या अंगावर दागिने पाहिल्यावर त्या भाभी काम द्यायच्या नाहीत अशी भीती घातली.कामाची आवश्यकता असल्याने त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी सोन्याचे गंठण आणि लक्ष्मीहार असा ५६ हजारांचा ऐवज शंभर रुपयांच्या नोटेत बांधण्याचे नाटक केले. हातामध्ये असलेल्या रुमालात हा सर्व ऐवज ठेवला. त्यांचे लक्ष विचलित करुन त्याने रुमाल बदलला. आरोपी तेथून गेल्यावर ही महिला पहिल्या मजल्यावर गेली. मात्र, तेथे कोणी भेटले नाही.घरी जाऊन रुमाल उघडून पाहिल्यावर त्यामध्ये विटांचे खडे बांधल्याचे आढळून आले. यासंदर्भात त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कविता पाडोळे करीत आहेत.बतावणी करून ज्येष्ठांना टार्गेटलग्नसराई सुरु झालेली आहे. नागरिकांनी घरातील आणि बँकांमधील लॉकरमधील दागिने बाहेर काढायला सुरुवात केली आहे. याकाळात चोरटे अधिक सक्रिय होतात. त्यामुळे चोऱ्या आणि अशा प्रकारची फसवणूक होण्याची शक्यता असते. चोरटे ज्येष्ठ नागरिकांना पोलीस असल्याची बतावणी करुन, तसेच आनंदाच्या वार्ता सांगून भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने गंडवितात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे. तसेच आपल्याकडील मौल्यवान दागिने कोणाकडेही देऊ नयेत. संशयास्पद व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.- कविता पाडोळे,पोलीस उपनिरीक्षक

टॅग्स :Puneपुणे