शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 12:17 IST

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचे जयंत पाटील यांनी संकेत दिले आहेत.

Jayant Patil: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २६ व्या वर्धापनदिनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. पक्षाच्या वर्धापन दिनीच मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची आवश्यकता असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटलं. तसेच शरद पवार यांनी यावर योग्य तो निर्णय घ्यावा असेही जयंत पाटील यांनी म्हटलं.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, निलेश लंके यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली.  प्रदेशाध्यक्ष पदाची सात वर्षे संधी दिली असं जयंत पाटील म्हणाले. नव्या चेहऱ्यांना संधी देऊन आपल्याला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करण्याची मागणी जयंत पाटील यांनी यावेळी केली.

"मला शरद पवार यांनी बरीच संधी दिली. प्रदेशाध्यक्ष पदाचा सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. या निमित्ताने तुमच्या सर्वांच्या देखत मी शरद पवार यांना विनंती करतो," असं जयंत पाटील म्हणाले. त्यानंतर जयंत पाटील यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. त्यामुळे जयंत पाटील यांना आपले भाषण आवरते घ्यावे लागले. यावेळी शेवटी पक्ष शरद पवार यांचा आहे, त्यामुळे शरद पवार यांनी त्याच्यावर योग्य तो निर्णय घ्यावा, कारण आपल्याला अजून परत पुढे जायचं आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.

"एकेकाळी भाजपचे दोनच खासदार निवडून आले होते. आज तो देशातील मोठा पक्ष झालेला आहे. त्यामुळे घाबरु नका. आपण सगळे ताकदीने कामाला लागलो तर या राज्याची ही लढाई आपण पुन्हा जिंकू शकतो. ही लढाई तुकाराम विरुद्ध नथुराम अशी आहे हे कधीही विसरु नका. आपण तुकारामांच्या बाजूचे आहोत," असं जयंत पाटील यांनी यावेळी म्हटलं. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळे