पुणे : यंदा पाणीटंचाईच्या झळा तीव्र असून आज जिल्ह्यात २५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मार्चमध्ये सुरू झालेले टँकर वर्ष संपत आले तरी सुरूच आहेत. गेल्यावर्षी आजच्या तारखेला एकही टँकर सुरू नव्हता.२० गावे व ११८ वाड्यांवर ५२ हजार ९५७ लोकसंख्येला टँकरने पाणी सुरू आहे. पाणीटंचाईच्या झळा सर्वाधिक इंदापूर तालुक्याला बसत असून ८ टँकरने ८ गावे १७ वाड्यांवर २१ हजार ६९५ लोकसंख्येला पाणी दिले जात आहे. त्यानंतर दौैंड व पुरंदर तालुक्याला ६, तर बारामतीला ५ टँकर सुरू आहेत. गेल्या वर्षी जानेवारीत एकही टँकर सुरू नव्हता, असे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. या वर्षी गेल्या महिन्यात टँकरची संख्या कमी होऊन १८ वर आली होती. टंचाई जाणवू लागल्याने पुन्हा टँकरची मागणी होऊन आता २५ टँकर सुरू आहेत. (वार्ताहर)
जानेवारीतही जिल्ह्यात २५ टँकरने पाणीपुरवठा
By admin | Updated: January 21, 2016 01:19 IST