शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

उलगडणार सावरकर गाथा!; शनिवारवाडा प्रांगणात १३ जानेवारीला अनोखा कार्यक्रम ‘यशोयुतां वंदे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 12:49 IST

संगीत, नृत्य, चित्र, शिल्प, साहित्य व रंगावली या कलाविधांच्या माध्यमातून ‘यशोयुतां वंदे’ हा अनोखा कार्यक्रम सादर होणार आहे. मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला १३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता शनिवारवाड्याच्या प्रांगणात सावरकर गाथा उलगडेल.

ठळक मुद्देपुण्यातील १०० हून अधिक कलाकार यामध्ये होणार सहभागीअडीच तासांच्या या कार्यक्रमात नृत्य, गाणी, पोवाडे, शिल्प, साहित्य, रांगोळी यांची गुंफण

पुणे : भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्वाच्या अनेक अपरिचित पैलूंची झलक कलाविष्कारातून पाहायला मिळणार आहे. संगीत, नृत्य, चित्र, शिल्प, साहित्य व रंगावली या कलाविधांच्या माध्यमातून ‘यशोयुतां वंदे’ हा अनोखा कार्यक्रम सादर होणार आहे. मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला १३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता शनिवारवाड्याच्या प्रांगणात सावरकर गाथा उलगडेल. पुण्यातील १०० हून अधिक कलाकार यामध्ये सहभागी होणार आहेत.  स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कायम दोन टोकांच्या भूमिकांमधून पाहिले गेले आहे. प्रत्यक्षात, व्यक्ती म्हणून ते किती महान होते, हा पैलू कायम दुर्लक्षित राहिला आहे. सावरकरांची विज्ञानदृष्टी, समाजसुधारणेतील पुढाकार, जातिनिर्मूलनाची चळवळ असे विविध कंगोरे ‘यशोयुतां वंदे’मधून अनुभवता येणार आहेत’, अशी माहिती सारंग कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.  या वेळी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत साठे, दीपा सपकाळ, गायिका अर्चना पंतसचिव, नृत्यांगना रसिका गुमास्ते आदी उपस्थित होते.कार्यक्रमाची संहिता दीपा सपकाळ यांनी लिहिली असून, सामाजिक सलोखा वाढवण्यावर सावरकरांनी कशा प्रकारे भर दिला, याचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अडीच तासांच्या या कार्यक्रमात नृत्य, गाणी, पोवाडे, शिल्प, साहित्य, रांगोळी यांची गुंफण करण्यात आली आहे. अभिजित धोंडफळे शिल्प साकारणार असून, सोमनाथ भोंगळे रांगोळी रेखाटणार आहेत. या कार्यक्रमासाठी राज्याच्या पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, नृत्यगुरू पं. मनीषा साठे, साहित्यिका डॉ. माधवी वैद्य, लेखक डॉ. राजेंद्र खेर, आमदार मेधा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

महानगरपालिकेची परवानगीशनिवारवाड्यावरील एल्गार परिषदेबाबत झालेल्या गदारोळानंतर ‘यशोयुतां वंदे’ या कार्यक्रमासाठी सुरुवातीला परवानगी नाकारण्यात आली होती. कोणत्याही प्रकारच्या आक्षेपार्ह सादरीकरणाचा यात समावेश नसल्याची खात्री पटवून देण्यात आल्यानंतर मंगळवारी महानगरपालिका आणि पोलिसांतर्फे परवानगी देण्यात आली.

टॅग्स :shanivar wadaशनिवारवाडाPuneपुणे