शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त वाहनांना जॅमर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 23:34 IST

मागील दोन महिन्यांपासून बारामती शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर पोलिसांकडून मेहनत घेतली जात आहे. तसेच बेशिस्त

बारामती : मागील दोन महिन्यांपासून बारामती शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर पोलिसांकडून मेहनत घेतली जात आहे. तसेच बेशिस्त वाहनचालकांवर देखील कारवाई केली जात आहे. आता शहरांतर्गत रस्त्यांवर बेशिस्तपणे पार्किंग केलेल्या वाहनांना जॅमर लावण्यात येत असल्याने बेशिस्त पार्किंगला आळा बसण्यास मदत होणार आहे.

बेशिस्त वाहतुकीबाबत मागील दोन महिन्यांपासून शहर पोलिसांनी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. सर्वच प्रमुख चौकांमध्ये सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी पोलीस व होम गार्डच्या मदतीने वाहतूक नियंत्रण केले जाते. परिणामी शहरातील वाहतुकीला काही प्रमाणात शिस्त लागली आहे. शहरातील प्रमुख चौक, रस्त्यांवर गर्दी असते. प्रमुख चौकांमध्ये होणारी कोंडी टाळण्यासाठी शहर पोलीस ठाण्याने कंबर कसली आहे. पंचायत समिती चौक, टिसी महाविद्यालय परिसरात पोलिसांनी चारचाकी वाहनांवर कारवाई करीत जॅमर लावले. प्रमुख चौकांमध्ये पोलीस कर्मचारी दररोज थांबत असल्याने नागरिकांकडूनही नियमांचे पालन होऊ लागले आहे.शहरातील सिनेमा रस्ता, इंदापूर रस्ता, तीन हत्ती चौक, कचेरी रस्ता, खाटीक गल्लीचा परिसर अशा अनेक मुख्य रस्त्यांवर चारचाकी वाहने अस्ताव्यस्त पार्किंग केली जातात. वाहने लावून वाहनमालक बिनधास्त निघून जातात. रस्त्याच्या मधेच उभ्या केलेल्या अशा वाहनांमुळेकोंडीमध्ये भर पडते. पोलिसांनी अनेकदा आवाहन करूनही त्यात सुधारणा दिसून आली नाही. त्यामुळे आता बेशिस्त पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनाला थेट जॅमर लावले जात आहेत. जॅमर लावल्यामुळे शहर पोलीस ठाण्यात येत दंड भरूनच आपले वाहन न्यावे लागत आहे. त्यामुळे वाहन पार्किंग करताना काही अंशी शिस्त लागणार आहे.

टॅग्स :Puneपुणे