शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
4
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
5
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
6
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
7
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
8
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
9
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
10
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
11
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
12
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
13
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
14
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
15
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
16
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
17
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
18
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
19
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
20
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...

जॅमरने नागरिक झाले जाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 03:00 IST

खासगी प्रवासी वाहतुकीकेडे अर्थपूर्ण कानाडोळा, सामान्य नागरिकांना मात्र त्रास

हडपसर : वाहतूक शाखेची जॅमर कारवाई जोरदार सुरू आहे. या कारवाईतून हडपसर पोलीस ठाण्यासमोरील पोलिसांची वाहनेही सुटली नाहीत. मात्र, जॅमर लावल्यानंतर कोणाशी संपर्क करायचा, हे लिहिण्याची तसदी जॅमर कारवाई करणाऱ्या अधिकाºयांनी घेतली नाही. त्यामुळे ज्या वाहनांना जॅमर लावला, त्यांना तासन्तास वाहतूक पोलिसांची वाट पाहण्याशिवाय पर्याय उरला नाही. या ठिकाणी नो-पार्किंगचा फलक नाही, तरीसुद्धा कारवाई केल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बसथांब्यासमोर आणि रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारी ट्रॅव्हल्स बस, खासगी प्रवासी वाहने, पॅगो, मॅजिक, सहाआसनी आणि तीन आसनी रिक्षा यांच्यावरही त्याच तडफेने कारवाई करण्याची गरज आहे. शाळा-महाविद्यालयाच्या परिसरामध्येही वाहतूककोंडी होते. त्यामुळे मुलांचा जीव गुदमरून जातो. वाहतूक पोलिसांकडून लायसन्स, हेल्मेट, वाहनांची अस्सल कागदपत्रे, सीटबेल्ट लावला आहे, सिग्नल तोडला का हे पाहून कारवाई केली जात आहे.खासगी ट्रॅव्हल्स, पॅगो, रिक्षा, सहाआसनी, मॅजिक या वाहनांना का सूट दिली जाते. अनेक रिक्षाचालकांकडे परवाना नाही, परमिट नाही, पासिंग न करताच रिक्षा चालवल्या जातात, ही बाब वाहतूक पोलिसांच्या दृष्टीने गौण आहे का, याचे उत्तर गुलदस्त्यातआहे. दुचाकीला जॅमर लावले की आपले काम झाले, अशी भावना वाहतूक पोलिसांची झाली आहे. जॅमर लावल्यानंतर त्या वाहनचालकांच्या अडचणी का समजून घेत नाही. पीएमपी डेपोसमोर बसथांब्यावर सर्रास रिक्षा उभ्या राहतात, त्यांच्यावर अशी कारवाई करण्याचे धाडस का दाखविले जात नाही, अशी विचारणा नागरिकांनी केली आहे.गाडीतळावर कारवाई कधी?हडपसर पीएमपी डेपो की रिक्षा अड्डा असे वृत्त गुरुवारी (दि. १३) दै. लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले. पदपथावर रिक्षा स्टँड आहे, काही रिक्षा स्टँडवर पाच रिक्षांना परवानगी आहे, तेथे दहा-बारा रिक्षा उभ्या राहतात. वाहतुकीला अडथळा ठरतात. तरीसुद्धा त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही. दुचाकीवर मात्र प्राधान्याने कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस का सरसावतात, असा सवाल नागरिकांना पडला आहे.जॅमर लावलेला वाहनचालक दंड भरण्यासाठी दोन दोन तास वाट पाहत ताटकळत उभा असतो, याबाबत वाहतूक पोलीस अधिकारी म्हणतात, आम्हाला अनेक कामे आहेत. वाहतूककोंडीत अडकलेलो असतो. नागरिकांच्या सोयीसाठीच आम्ही कारवाई करतो.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकTrafficवाहतूक कोंडी