शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात साकारत आहे ‘जयपूर गुणीजन खाना’; अभिजात संगीताविषयी उलगडणार माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 11:47 IST

किराणा घराण्यानंतर जयपूर अत्रौली घराण्याचा इतिहास समोर आणला जाणार आहे. घराण्याच्या परंपरेचे पाईक असलेल्या नामवंत कलाकारांच्या सांगीतिक प्रवासाची अनुभूती देणारी ‘गॅलरी’ पुण्यात साकारली जात आहे. ‘जयपूर गुणीजन खाना’असे त्याचे नाव असणार आहे. 

ठळक मुद्देघराण्याबरोबरच गुरुंबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक शिष्यांनी घेतला पुढाकाररसिकांना दि. ३ ते ११ फेब्रुवारी दरम्यान आयोजित कार्यक्रमात घेता येणार मैफलींचा आस्वाद

पुणे : भारतीय अभिजात संगीत क्षेत्रात घराण्यांची एक परंपरा चालत आली आहे.  संगीतविश्वात अजरामर झालेली अनेक प्रतिभावंत कलाकार मंडळी ओळखली जातात, ती त्यांच्या घराण्यांच्या गायकीवरूनच. आता किराणा घराण्यानंतर जयपूर अत्रौली घराण्याचा इतिहास समोर आणला जाणार आहे. या घराण्याचे सौंदर्य उलगडणारी आणि घराण्याच्या परंपरेचे पाईक असलेल्या नामवंत कलाकारांच्या सांगीतिक प्रवासाची अनुभूती देणारी ‘गॅलरी’ पुण्यात साकारली जात आहे. ‘जयपूर गुणीजन खाना’असे त्याचे नाव असणार आहे. घराण्याबरोबरच गुरुंबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक शिष्यांनी पुढाकार घेतला. त्याचेच प्रतीक म्हणजे स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांनी किराणा घराण्याच्या समृद्ध गायकीचा वारसा पुढे नेण्यासाठी सुरू केलेला ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव.’ त्यांची ही गानपरंपरा त्यांचे शिष्य पुढे नेत आहेत.  विशेष म्हणजे, गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या शिष्यांनी घराण्याचा सांगीतिक वारसा जपण्यासाठी पुढाकार घेतला आहे. किशोरीतार्इंचे शिष्य पं. रघुनंदन पणशीकर यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून संगीताचे शिक्षण घेणाऱ्या राधिका जोशी-रे यांच्या फर्ग्युसन रस्त्यावरील छोट्याशा जागेत भारतीय अभिजात संगीताला वाहिलेली ही गॅलरी  साकारली जात आहे. उस्ताद अल्लादिया खाँ यांनी जयपूर-अत्रौली घराण्याची परंपरा निर्माण केली. भास्करबुवा बखले, भूर्जी खाँ, केसरबाई केरकर, वामनराव सडोलीकर, मल्लिकार्जुन मन्सूर, निवृत्तीबुवा सरनाईक, मोगूबाई कुर्डीकर, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. उल्हास कशाळकर, धोंडुताई कुलकर्णी आणि गानसस्वती किशोरी अमोणकर ही या अभिजात सांगीतिक घराण्याच्या दरबारातील अलौकिक अशी रत्ने. या घराण्याच्या सौंदर्याबरोबरच घराण्याचा वारसा पुढे नेणाऱ्या कलाकारांचे दुर्मिळ  रेकॉर्डिंग, घराण्याची माहिती आणि त्यांनी लिहिलेली पुस्तके असा अमूल्य ठेवा या गॅलरीमध्ये जतन केला जाणार आहे. सध्या कॅटलॉगिंग करण्याचे काम सुरू आहे. ‘गानसरस्वती यशोगाथा’ गानसरस्वती किशोरी अमोणकर यांचे अभिजात स्वर म्हणजे केवळ श्रवणीय अनुभूती नसते, तर संगीताची ती एक चिंतनशील आणि आध्यात्मिक बैठक असते.  या गॅलरीमध्ये जयपूर अत्रौली घराण्याच्या किशोरी अमोणकर यांच्या गानसंपदेच्या लिखित, मौलिक ठेव्यांसह अर्ध्या तासाच्या दृकश्राव्य मैफलींचा आस्वाद रसिकांना दि. ३ ते ११ फेब्रुवारी दरम्यान आयोजित ‘गानसरस्वती यशोगाथा’ या कार्यक्रमात घेता येणार आहे.  जागा अपुरी असल्याने कार्यक्रमासाठी नोंदणी करणे बंधनकारक आहे. या कार्यक्रमाची घोषणा गानसरस्वती महोत्सवात केली जाणार असल्याचे राधिका जोशी यांनी सांगितले. 

गॅलरी मार्चमध्ये होणार खुली मार्चमध्ये ही गॅलरी खुली करण्याचा विचार असून, यामध्ये छोटेखानी मैफली, नामवंत कलाकारांच्या मुलाखती, संगीताच्या शोधनिबंधांचे सादरीकरण असे विविध कार्यक्रम करण्याचा मानस असल्याची माहिती ज्येष्ठ गायक पं. रघुनंदन पणशीकर यांच्या शिष्या राधिका जोशी-रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

टॅग्स :Puneपुणे