मांजरी : मांजरी खुर्दमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला मांजरीतील भिमसैनिकांनी पुष्पहार घालून त्यांना मानवंदना दिली. यावेळी जय भवानी जय शिवाजी, जय भिम अशा घोषणा देऊन वातावरण शांत करण्याचे आवाहन करण्यात आले. भिमा कोरेगाव येथे घडलेली घटना दुर्दैवी असून त्याचा निषेध शांतपणे करण्याचे आवाहन भीमसैनिक करत होते. नागरिकांनीही त्यांच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद दिला.
‘जय भवानी जय शिवाजी, जय भिम’च्या घोषणा; मांजरीत भीमसैनिकांकडून शिवरायांना पुष्पहार अर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 13:15 IST