पुणे: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध संस्था, संघटना, पक्ष यांच्या वतीने एसएसपीएमएस शाळेतील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. शिवरायांना मानवंदना देत ‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष केला.
..
झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सुरेखा भालेराव, वंदना पवार, महादेव मोरे, प्रदीप पवार आदी उपस्थित होते.
..........
राष्ट्रवादी काँग्रेस पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या वतीने अध्यक्ष आनंद सवाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. या वेळी हृतिक सवाणे, महेंद्र कांबळे, शुभम माने, आकाश वाघ आदी उपस्थित होते.
...........
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. सुधाकर पणीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. या वेळी जिल्हाध्यक्ष सुशील मंचरकर, दीपक निनारिया, नितीन ननवरे, चंद्रकांत भोसले, गुलाब चव्हाण, नंदू करोते आदी उपस्थित होते.
...............
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कसबा ब्लॉकच्या वतीने उपाध्यक्ष बबलू कोळी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी गणेश जगताप, संजय चव्हाण, शैलेश भोकरे, गोरख पळसकर आदी उपस्थित होते. या वेळी कोळी यांच्या हस्ते नागरिकांना मास्कवाटप करण्यात आले.
.........
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सरचिटणीस रोहित टिळक आणि प्रवीण करपे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. या वेळी किरण गायकवाड, गौरव बोराडे, सागर सासवडे, दिनेश कांबळे, रवी पठारे आदी उपस्थित होते.
..........
मृत्युंजय मित्र मंडळाच्या वतीने पुणे जिल्हा ग्राहक सोसायटीचे संचालक ॲड. फैय्याज शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. या वेळी मंडळाचे अध्यक्ष तुषार पंडित, मंगेश खेडेकर, स्वप्नील भस्मारे, रोहित पंडित, अजय मोरे, किरण जोशी आदी उपस्थित होते.
.............
प्रियदर्शनी शिक्षण संस्था आणि महिला मंडळाच्या वतीने शशिकला कुंभार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. या वेळी महिला मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
..............
‘दलित पँथर ऑफ इंडिया’च्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष बापू भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष इलियास शेख, परवेज शेख, शाहरुख पठाण आदी उपस्थित होते.
............
क्रांतिगुरु लहुजी महासंघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रकाश वैराळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. या वेळी एकनाथ चांदणे, बाळासाहेब मोहिते, शैलेश आवळे, अरविंद वाघमारे मंगेश जाधव आदी उपस्थित होते.
..............
महाराष्ट्रीयन उत्तर भारतीय एकता मंचच्या वतीने संस्थापिका अध्यक्षा संगीता तिवारी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. या वेळी पुणे विभाग अध्यक्ष के. एल. सहानी, मनोज मिश्रा, प्रदीप परदेशी आदी उपस्थित होते.
...............
रिपब्लिकन सम्यक सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष अमोल तुजारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. या वेळी उमेश गवळी, विजय अडागळे, किरण मोरे, प्रवीण वाघमारे आदी उपस्थित होते.
............
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पुणे शहर अध्यक्ष विनायक रुपनवर, पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. या वेळी संजय माने, अंकुश देवडकर, उमेश कोकरे, सविता जोशी, सचिन गुरव आदी उपस्थित होते.
...............
विलास चौरे समाजसेवा प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब चौरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. या वेळी हर्षदा चौरे, अर्चना कांबळे, नरेश जगताप, मुकुंद कांबळे आदी उपस्थित होते.
............
पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने सचिव राहुल खुडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. या वेळी गोवर्धन खुडे, चेतन बदोले, किरण कदम, विजय कणसे, दिनेश पवार आदी उपस्थित होते.