शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

इटस अ लीकी इश्यू ! अनैैच्छिक लघवी होण्याची समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 02:33 IST

महिला आजही स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना आणि काही आजारांबाबत मौैन पाळताना दिसतात. काम किंवा व्यायाम करताना, शिंकताना अथवा खोकताना अनैच्छिकपणे लघवी होण्याची समस्या महिलांना उद्भवते.

पुणे - महिला आजही स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना आणि काही आजारांबाबत मौैन पाळताना दिसतात. काम किंवा व्यायाम करताना, शिंकताना अथवा खोकताना अनैच्छिकपणे लघवी होण्याची समस्या महिलांना उद्भवते. स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टिनन्स या आजाराबाबत आजही महिला जागृत नसल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. भारतात १२ टक्के महिला या आजाराने पीडित असल्याचा अंदाज वैैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवला आहे. जगभरातील ४५ वर्षांवरील २०.८ टक्के महिलांमध्ये हा आजार आढळून येतो. महिला बऱ्याचदा हा आजार अंगावर काढतात; कारण त्यांना याबाबत चर्चा करण्याची लाज वाटते. हा आजार वैद्यकीय उपचारांसह बरा होऊ शकतो. याबाबत त्यांच्यामध्ये पुरेशी जागरूकतादेखील दिसून येत नाही, असे निरीक्षण पुण्यातील इंटरनॅशनल सोसायटी फॉर गायनॅकोलॉजी एन्डोस्कोपीने नोंदवले आहे. डॉ. सुनीता तांदुळवाडकर म्हणाल्या, ‘एसयूआय हा आजार पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक दिसून येतो. सामाजिक जीवनातील जीवनशैलीमधून अनेक व्यक्तींना एसयूआय आजार होतो.रुग्ण हा आजार कुटुंब, मित्र व डॉक्टरांपासून लपवण्याचा प्रयत्न करतात. या आजाराबाबत लाज वाटणे, गैरसमज आणि दुर्लक्षअशा गोष्टींमुळे महिला उपचारघेणे टाळतात. उपचार घेण्यामध्ये विलंब केल्याने हा आजार अधिक गंभीर होऊ शकतो. या आजाराच्या तणावामुळे सामाजिक जीवन व राहणीमानाच्या दर्जावरदेखील परिणाम होऊ शकतो.’वय हे या आजारामागचे एक कारण आहे. वाढत्या वयासह शरीरात होणारे बदलदेखील एसयूआय होण्यास कारणीभूत ठरू शकतात. प्रसूतीनंतरही एसयूआयचा त्रास होऊ शकतो. कारण, प्रसूतीदरम्यान ऊती किंवा मज्जातंतूंना इजा होऊ शकते. या इजांमुळे एसयूआय आजार प्रसूतीनंतर लगेच किंवा काही वर्षानंतर होऊ शकतो.- डॉ. रिश्मा पै, अध्यक्षा,इंडियन असोसिएशन आॅफ गायनॅकोलॉजिकल एन्डोस्कोपीस्ट्सएसआययू म्हणजे काय?मूत्राशयाला मदत करणारे स्नायू व इतर ऊती, लघवी बाहेर पडण्यामध्ये मदत करणारे स्नायू कमकुवत झाल्याने एसयूआय आजार होतो.लठ्ठ आणि हिस्टेरक्टॉमी झालेल्या महिलांनादेखील हा आजार होऊ शकतो. पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाच्या उपचारादरम्यान प्रोस्टेट ग्रंथी काढून टाकण्यासाठी केलेल्या शस्त्रक्रियेमुळे एसयूआय होऊ शकतो.वैयक्तिक स्वच्छता हाच प्रतिबंधात्मक उपाय आहे. या आजारामुळे त्वचा संसर्ग व मूत्रपिंडविषयक आजार होऊ शकतात.या आजारावर अत्यंत कमी इन्वेसिव्ह प्रक्रियांसह सुलभपणे व परिणामकारक उपचार करता येऊ शकतो.

टॅग्स :Womenमहिलाnewsबातम्या