शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

औंध येथील आयटीआयचे विद्यार्थी शिकणार रोबोटिक तंत्रज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 19:35 IST

येत्या शैक्षणिक वर्षापासून रोबोटिक व मेकॅट्रोनिक्स या विषयावर आधारित प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.

ठळक मुद्देऔंध आयटीआयमध्ये प्रशिक्षण : रोबोटिक शिकविणारे देशातील पहिले आयटीआयचा दावाकंपन्यांमध्ये आवश्यक असणारे रोबोटिक्सचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना आयटीआय मध्ये मिळणार अभ्यासक्रमासाठी जपानच्या यासकावा या कंपनीने सुमारे ९३ लाख रुपये किंमतीचे दोन रोबोट

पुणे : औंध येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) विद्यार्थ्यांना रोबोटिक तंत्रज्ञानाचे धडे दिले जाणार आहेत. हे तंत्रज्ञान शिकविणारे देशातील हे पहिले ‘आयटीआय’ असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यासाठी संस्थेमध्ये स्वतंत्र कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. मागील काही वर्षांपासून रोबोटिक तंत्रज्ञानाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी करिअरचे नवीन दालन खुले झाले आहे. यापार्श्वभुमीवर औंध आयटीआयमध्ये सुरू होणाऱ्या नवीन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. औंध आयटीआय तंत्र सल्लागार समितीचे अध्यक्ष आमदार विजय काळे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी प्राचार्य प्रकाश सायगावकर उपस्थित होते. संस्थेमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून रोबोटिक व मेकॅट्रोनिक्स या विषयावर आधारित प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी मिळणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी संस्थेला एकुण २ कोटी ६८ लाख रूपयांचा निधी मिळाला आहे. त्यापैकी ७५ टक्के निधी केंद्र सरकार व २५ टक्के निधी राज्य सरकारकडून मिळत आहे.कंपन्यांमध्ये आवश्यक असणारे रोबोटिक्सचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना आयटीआय मध्ये मिळणार आहे. रोबोटिक्स प्रोग्राम हा १ महिन्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम असून त्याची प्रवेशक्षमता १८ इतकी आहे. प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य यानुसार प्रवेश दिले जाणार आहेत. अभियांत्रिकीची पदवी, पदविका किंवा आयटीआय असलेला विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र आहे. मेकॅट्रॉनिक्सला पूरक असलेल्या रोबोटिक्स तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमासाठी जपानच्या यासकावा या कंपनीने सुमारे ९३ लाख रुपये किंमतीचे दोन रोबोट दिले आहेत. संस्थेमार्फत माफक शुल्कात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. डी.व्ही. कुलकर्णी व एन.एम. काजळे यांच्यावर अभ्यासक्रमाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, असे काळे यांनी सांगितले. ----------

टॅग्स :Puneपुणेiti collegeआयटीआय कॉलेजRobotरोबोटAundhऔंध