शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

‘आयटीआय’चा विस्तार रखडला; आराखड्याला मंजुरी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 02:46 IST

तब्बल ६० हजार जागांची वाढ अधांतरी

पुणे : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थे(आयटीआय)चा विस्तार लाल फितीत अडकला आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात राज्य शासनाकडे देण्यात आलेल्या विस्तार आराखड्याला अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून अपेक्षित असलेली तब्बल ६० हजार जागांची वाढ सध्या तरी धुसर असल्याचे चित्र आहे.मागील काही वर्षांपासून ‘आयटीआय’कडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत चालला आहे. केंद्र व राज्य शासनाकडूनही व्यवसाय व कौशल्य शिक्षणावर भर दिला जात आहे. त्यामुळे राज्यातील ‘आयटीआय’चे सक्षमीकरण करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी मागील वर्षी विस्तार आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यामध्ये तब्बल ६० हजार प्रवेशक्षमता वाढीचा प्रस्ताव आहे. सध्या राज्यात शासकीय ४१७ व खासगी ४९१ आयटीआय आहे. त्यामध्ये अनुक्रमे ९३ हजार ४८१ व सुमारे ४५ हजार एवढी प्रवेशक्षमता आहे. आराखड्याला मंजुरी मिळाल्यास सद्य:स्थितीतील सुमारे १ लाख ३८ हजार प्रवेशक्षमता २ लाखांवर पोहोचणार आहे.प्रामुख्याने शासकीय आयटीआयची क्षमता वाढविण्याचा प्रस्तावित आहे. सध्या राज्यात ४१ आयटीआय तीन सत्रात, २३४ दोन सत्रात, तर १४२ आयटीआय एका सत्रात चालतात. संबंधित आयटीआयमधील पायाभूत सुविधा व क्षमतेनुसार तुकड्या वाढविणे, एका व दोन सत्रातील आयटीआयमध्ये सत्रात वाढ करण्यात येणार आहे; तसेच सध्याच्या ७९ व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये वाढ, बदल करणे, कालसुसंगत अभ्यासक्रम तयार करणे, मागणी नसलेले अभ्यासक्रम बंद करण्याबाबतही आराखड्यात शिफारशी करण्यात आल्या आहेत; तसेच राज्यातील शासकीय तांत्रिक विद्यालयातील किमान कौशल्यावर आधारित व्यवसाय अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) बंद करण्याबाबतही मागील वर्षी चर्चा करण्यात आली होती. या अभ्यासक्रमांऐवजी येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘आयटीआय’ मधील अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन होते; पण कर्मचारी संघटनांनी विरोध केल्याने हा प्रस्ताव बारगळल्याचे समजते.आराखड्यावर मे अखेरपर्यंत निर्णय ?लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने मे अखेरपर्यंत आराखड्यावर निर्णय होण्याची शक्यता नाही. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश क्षमतेत होणार की नाही, याबाबत साशंकता आहे. दर वर्षी आयटीआयला प्रवेश क्षमतेपेक्षा जवळपास दुप्पट अर्ज प्राप्त होतात. जागेअभावी लाखो विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे प्रवेश क्षमतेत वाढ करण्याची मागणी सातत्याने होत असते.विस्तार आराखडा राज्य शासनाकडे जुलै महिन्यात सादर करण्यात आला आहे; पण त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. आयटीआयच्या विस्तारामुळे शासनावरील आर्थिक भार मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. तुकड्या वाढ केल्यानंतर, शिक्षकभरती करावी लागणार आहे. त्यामुळे शासनाकडून या आराखड्यावर निर्णय घेण्यास वेळ लागत आहे. शासनाने व्यवसाय शिक्षण विभागाला आकृतिबंध सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आराखडा अद्याप अंतिम झाला नसल्याची माहिती विभागातील अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली.

टॅग्स :iti collegeआयटीआय कॉलेज