शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

मूल्यांची प्रतारणा होऊ न देणे ही आपली जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 04:20 IST

शॉप अ‍ॅक्टखाली आलो म्हणून डॉक्टरांनी स्वत:ला व्यावसायिक मानणे योग्य नाही. कारण व्यवसाय म्हटले की त्यात साम, दाम, दंड, भेद वापरून काम करण्यात येते. सरकार आपल्याला काय म्हणते त्यापेक्षा आपण स्वत:ला काय मानतो हे महत्त्वाचे आहे.

पुणे - शॉप अ‍ॅक्टखाली आलो म्हणून डॉक्टरांनी स्वत:ला व्यावसायिक मानणे योग्य नाही. कारण व्यवसाय म्हटले की त्यात साम, दाम, दंड, भेद वापरून काम करण्यात येते. सरकार आपल्याला काय म्हणते त्यापेक्षा आपण स्वत:ला काय मानतो हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्यामधील मूल्यांची प्रतारणा होऊ न देणे ही आपली जबाबदारी आहे, असे मत मेळघाटात आरोग्य विषयक काम करणारे डॉ. रवींद्र कोल्हे यांनी रविवारी व्यक्त केले.जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (जीपीए) च्या नवीन कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ टिळक रोडवरील डॉ. के. एच. संचेती हॉल येथे पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.डॉ. स्मिता कोल्हे, निष्कर्ष लॅबचे प्रमुख डॉ. राम साठ्ये, जीपीएचे मावळते अध्यक्ष डॉ. संतोष गोसावी, नवनियुक्त अध्यक्ष डॉ. प्रवीण दरक, माजी अध्यक्ष संजय वाघ, अभिनेत्री प्राजक्ता माळी, उपाध्यक्षा डॉ. संगीता खेनट, सचिव डॉ. धनश्री वायाळ आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. गोसावी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे डॉ. दरक यांच्या हाती सोपवली. तसेच जीपीए आणि रिबर्थ संस्थेच्या वतीने वर्षभर राबविण्यात येणाºया अवयवदान मोहिमेचा शुभारंभ कार्यक्रमात करण्यात आला. त्याच्या पोस्टरचे अनावरण उपस्थितांच्या हस्ते केले.सध्या सुमारे ९९ टक्के डॉक्टर योग्यरीत्या आपली जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र उर्वरित एका टक्क्यामुळे हा पेशा बदनाम होत आहे. डॉक्टरांनी चुकीचे काही केले की, लगेच त्यावर फोक स करण्यात येतो. मात्र त्यांच्या चांगल्या कामाची कोणी दखल घेत नसल्याची खंत डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली.शेवटचा दिवस गोड करण्यासाठी जगावे. आपल्या बँक खात्यातील एकावर किती शून्य आहेत, याचे मूल्य मोठे की जगण्याचे समाधान, याचा विचार आजच्या पिढीने करावा, असेही ते म्हणाले.स्मिता कोल्हे म्हणाल्या, की स्त्रीभ्रूणहत्या होतेय म्हणून आपण मोर्चे काढले. पण आदिवासी संस्कृतीमध्ये कधीच स्त्रीभ्रूणाची हत्या होत नाही. तेथे वृद्धाश्रम नाहीत. स्त्रियांनी कमावलेल्या प्रत्येक गोष्टीवर फक्त त्यांचाच हक्क आहे. आपल्या ताटातील अर्धी भाकर देण्याची वृत्ती मेळघाटात असल्यानेच आम्ही तेथे काम करतोय. खजिनदार डॉ. रुपा अगरवाल यांनी सूत्रसंचालन केले.नको त्या उपचारासांठी भाग पाडणे चुकीचेरुग्णाला काहीही झालेले नसताना त्याला नको ते उपचार घेण्यासाठी भाग पाडणे, ही वृत्ती चुकीची आहे. गरजेपुरती मालमत्ता असणे मान्य. मात्र हाव कधीही करू नये, असे साठे म्हणाले.डॉ. दरक म्हणाले, जीपीएच्या वतीने आतापर्यंत अनेक सामाजिक कामे केली आहेत. त्यामुळे ही डॉक्टरांची नाही तर एक सामाजिक संघटना आहे. येत्या वर्षभरात अवयवदानाचे ५० हजार अर्ज भरण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी डॉक्टर देत असलेल्या सेवेबद्दल त्यांचे आभार मानले.नवीन पदाधिकारीडॉ. प्रवीण दरक - अध्यक्षडॉ. संतोष गोसावी - माजी अध्यक्षडॉ. संगीता खेनट - उपाध्यक्षडॉ. रूपा अगरवाल - खजिनदारडॉ. धनश्री वायाळ - सचिवडॉ. शिवाजी कोल्हे - सचिवडॉ. हरिभाऊ सोनवणे - सहसचिवडॉ. शुभदा जोशी - सहसचिव

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या