शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

ज्याच्या विरोधात लढलो त्याचाच प्रचार करण्याची वेळ : सत्यजित तांबे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 13:05 IST

सत्यजित तांबे यांनी २०१४ साली संग्राम जगताप यांच्या विरोधात अहमदनगरमध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती.

ठळक मुद्देतरी आघाडीचा धर्म पाळणार आणि काहीही करून जगताप यांनी निवडून आणणार

पुणे : ज्याच्या विरोधात लढलो त्याचा प्रचार करण्याची वेळ आगामी लोकसभा निवडणुकीत माझ्यावर आली आहे.अशावेळी नगरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणे माझ्या किती जीवावर येत असेल अशा शब्दांत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली.पुण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप आणि इतर पक्षांनी एकत्र येऊन संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते.यावेळी व्यासपीठावर काँग्रेस राष्ट्रीय युवक अध्यक्ष केशवचंद्र यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा, शेकापच्या चित्रलेखा पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. सत्यजित तांबे यांनी २०१४ साली संग्राम जगताप यांच्या विरोधात अहमदनगरमध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत जगताप यांच्याकडून तांबे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. दरम्यान , यांनी नगरमध्ये काम करणेही थांबवले आहे. या बैठकीत त्यांनी व्यक्त केलेल्या वक्तव्यांवरुन 2014साली झालेला पराभव अजूनही त्यांच्या किती जिव्हारी लागला असल्याचे दिसून आले.  तांबे म्हणाले , ज्यांच्या विरोधात मी विधानसभा लढलो आता त्यांचा प्रचार करणं माझ्या जीवावर आले असले तरीही आम्ही आघाडीचा धर्म पाळणार आहोत. आणि काहीही करून जगताप यांनी निवडून आणणार आहोत.दक्षिण नगर लोकसभेची लढत ही महाराष्ट्रातल्या सर्वांत प्रतिष्ठेची लढत मानली जात आहे. यात राष्ट्रवादीच्या जगताप यांच्यासमोर काँग्रेस ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे भाजपमध्ये गेलेले चिरंजीव डॉ सुजय विखे पाटील यांचे आव्हान आहे.अशावेळी तांबे यांचे हे वक्तव्य आश्चर्यकारक मानले जात आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणSatyajit Tambeसत्यजित तांबेcongressकाँग्रेसSangram Jagtapआ. संग्राम जगतापLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक