शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

हनुमानाची जात काढणे चुकीचे नाही - अ‍ॅड. भास्करराव आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 01:38 IST

हल्ली हनुमान कोण? असा वाद सुरू आहे. पूर्वी एकच धर्म होता, तो म्हणजे वैदिक धर्म. रामायण साडेसहा हजार वर्षांपूर्वी घडले. हनुमान हा वैदिक कालखंडात होऊन गेला.

पुणे : हल्ली हनुमान कोण? असा वाद सुरू आहे. पूर्वी एकच धर्म होता, तो म्हणजे वैदिक धर्म. रामायण साडेसहा हजार वर्षांपूर्वी घडले. हनुमान हा वैदिक कालखंडात होऊन गेला. त्यावेळी अन्य धर्म नव्हते. हनुमान दंडकारण्यात राहणारा होता, म्हणूनच अन्य धर्म त्यानंतर उदयाला आले असल्याने त्याला कुणी मुस्लिम किंवा जाट म्हणत असतील तर ते चुकीचे नाही. कारण वैदिक धर्मातूनच त्यांची उत्पत्ती झाली, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांनी व्यक्त केले.वडगावशेरी येथील श्री साई प्रतिष्ठान आणि विश्वशांती बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ८ व्या राज्यस्तरीय निमंत्रितांचे कविसंमेलन हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट येथील मराठा चेंबर्स आॅफ कॉमर्स येथे आयोजिण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी रंगत-संगत प्रतिष्ठान व आडकर फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद आडकर यांना नाट्यसंंमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते ‘श्री साई जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. ‘रंग जीवनाचे’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांना ‘प्रेरणा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अ‍ॅड. भास्करराव आव्हाड, प्रमुख पाहुणे म. सा. प.चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, साई प्रतिष्ठान वडगावशेरीचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे आयोजक संजय चौधरी, दादासाहेब सोनावणे, हेमंत गलांडे उपस्थित होते.डी. डी. सोनावणे यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक संतोष हिंगणे आणि प्रा. रुपाली अवचरे यांनी सूत्रसंचालन केले. आयोजक संजय चौधरी यांनी आभार मानले.आव्हाड म्हणाले, की साहित्यिकांना कमी मानधन मिळते. त्यांच्या कामाचे मोल कमी असले तरी मूल्य अधिक असते. म्हणून मूल्य जोपासायचे काम केले पाहिजे.

टॅग्स :Puneपुणे