शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांची माथी भडकवणारा इसिस संबंधित डाॅक्टर जेरबंद;एनआयएची पुण्यात माेठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 04:52 IST

अनेक दस्तावेज जप्त

पुणे : इसिस महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या एका डॉक्टरला कोंढव्यातून अटक केली. या प्रकरणातील ही पाचवी कारवाई आहे. डॉ. अदनानली सरकार (४३) असे त्याचे नाव आहे. त्याच्या कोंढव्यातील घरात इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि ‘इसिस’शी संबंधित अनेक दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत. त्याद्वारे डॉ. सरकार हा तरुणांना प्रेरित करून संघटनेत भरती करीत असल्याचे उघड झाले.‘एनआयए’च्या तपासानुसार, डॉ. सरकार हा देशाची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत होता. पुण्यात एका इंजिनीअरला अटक केल्यानंतर एनआयएने मुंबई, ठाणे आणि पुणे येथे शोधमोहीम राबवली. 

त्यानुसार ३ जुलै रोजी एनआयएने इतर चार जणांना मुंबईत अटक केली होती. मुंबईतील तबिश नासेर सिद्दिकी, पुण्यातील जुबेर नूर मोहम्मद शेख, अबू नुसैबा आणि ठाण्यातील शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला अशी त्यांची नावे आहेत.

२ तरुणीही रडारवर

दोन दहशतवाद्यांच्या अटकेनंतर ‘अल सफा’च्या रतलाम मॉड्युलचा पर्दाफाश झाला असून, तिसरा आरोपीही पकडला गेला आहे. यात आणखी सहा आरोपी ‘अल सफा’च्या रतलाम मॉड्युलमध्ये सक्रिय असल्याचे एटीएसच्या तपासात उघड झाले आहे. यात दोन मुलींचाही समावेश आहे. त्यातील एक जामिया मिलियाची विद्यार्थिनी असलेली महिलाही एटीएसच्या रडारवर असल्याचे समजते.

कोण आहे कादीर?

अब्दुल कादीर दस्तगीर पठाणचा ग्राफिक्स डिझाईनचा व्यवसाय आहे. त्याने मोहम्मद खान आणि मोहम्मद साकी यांना काम देतो, असे सांगितले आणि त्यांना महिन्याला आठ हजार रुपये पगार दिला. तसेच, एक खोली राहायला दिली. 

रत्नागिरी/गोंदिया :  काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी दहशतवादी कटात सहभागी असल्याप्रकरणी दोघांना अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) रत्नागिरीतून एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले, तर दहशतवाद्यांना आश्रय दिल्याप्रकरणी गोंदियातून एकाला अटक केली होती. हा युवकही दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संशयित दहशतवाद्यांच्या चौकशीतून काही नावे समोर आली आहेत. दहशतवादी कारवाईत रत्नागिरीतील एकाचा समावेश असल्याची माहिती एटीएसला  मिळाल्यानंतर पोलिसांनी रत्नागिरीतून एकाला ताब्यात घेतले. पुण्यात अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या एका युवकाला गोंदियातून तीन दिवसांपूर्वी अटक केली होती. मूळ गोंदियाचा असलेल्या अब्दुल कादीर पठाण (३५) याने दहशतवाद्यांना पुणे येथे आश्रय दिला हाेता.

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणा