शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

Corona New Variant: कोरोनाचा नवा व्हेरिअंट चिंताजनक आहे का? काय म्हणाले अजित पवार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 13:25 IST

कोरोनाचा नवा व्हेरिएंटचे पुण्यात रुग्ण आढळून आले आहेत

बारामती : काही बातम्या अफवा असतात. तर काहींमध्ये तथ्य असते.  कोरोनाचा नवा व्हेरिअंट चिंता करण्यासारखा असेल तर त्याची माहिती आम्ही जनतेला देऊ. त्यामुळे उद्या मुंबई येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून या व्हेरिअंटबाबत नागरिकांनी काय काळजी घ्यायची याबाबत सुचना देण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

बारामती येथे विविध विकासकामांच्या दौऱ्यानिमित्त रविवारी (दि. २९) उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पवार पुढे म्हणाले, कोरोनाचा नवा व्हेरिएंटचे पुण्यात रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांना चौकशी करायला सांगितली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील याबद्दल माहिती घेत आहेत. सोमवारी या प्रकाराबद्दल माहिती घेतली जाईल. सगळ्या जनतेच्या दृष्टीने गंभीर बाब असेल तर जनतेला पण त्याच्या बद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल. आणि काय काळजी घेतली पाहिजे खबरदारी घेतली पाहिजे. त्याबद्दल देखील माहिती दिली जाईल.

मुंबई महानगर पालिकेत झालेल्या कथित घोटाळ्यांच्या आरोपांबाबत बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, असे आरोप नेहमी होत असतात. मात्र आरोप करणाऱ्याने त्याबाबत काही पुरावे दिले. घोटाळा झालेला निष्पन्न न होता, ज्या आरोपांमध्ये तथ्यनाही अशा आरोपांची दखल घेतली जात नाही. तसेच नवाब मलिकांचा राष्ट्रवादीला विसर पडला या विरोधकांच्या आरोपांबाबत विचारले असता आम्हाला कोणाचाही विसर पडत नाही. जी काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी आम्ही त्यांची घेत आहोत, असे आजित पवार यांनी उत्तर दिले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारcorona virusकोरोना वायरस बातम्याRajesh Topeराजेश टोपेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीdocterडॉक्टर