शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Omicron Variant: दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या 'आयर्नमॅन’ युवा खेळाडुची चाचणी ‘निगेटीव्ह’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 16:51 IST

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या आणि जगभरात सध्या चिंतेचा विषय असलेल्या ओमीक्रॉन व्हेरिएन्ट विषाणूची धास्ती सर्वांनीच घेतली

बारामती: दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या आणि जगभरात सध्या चिंतेचा विषय असलेल्या ओमायक्रॉन  व्हेरिएन्ट विषाणूची धास्ती सर्वांनीच घेतली आहे. या पार्श्वभुमीवर दक्षिण आफ्रिकेतील पोर्ट एलिझाबेथ येथे २१ नोव्हेंबर ला पार पडलेल्या जागतिक पातळीवरील स्पर्धेत यश मिळविलेल्या बारामतीकर युवा खेळाडुसह त्याच्या वडीलांची कोरोना चाचणी ‘निगेटीव्ह’ आली आहे.

ओमायक्रॉन  व्हेरिएन्ट विषाणू चा संसर्ग धोकादायक असून वेगाने फैलावण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. विशेषत: त्या देशातून महाराष्ट्रात परतलेले काहीजण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यामुळे बारामतीकर युवा खेळाडु आणि त्याच्या ‘स्पोर्टस मॅन’ वडीलांची कोरोना चाचणी नुकतीच करण्यात आली होती. ती निगेटीव्ह आली आहे. दोघे खेळाडु बापलेक नुकतेच काही दिवसांपुर्वी दक्षिण आफ्रिकेतून परतले आहेत. सहा दिवसांपूर्वी भारतात परतलेल्या बारामतीच्या खेळाडूची आणि त्याच्या वडिलांची कोरोना तपासणी बारामतीच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आली. दोघांचा देखील रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभाग आणि बारामतीकरांनी सुटकेचा निश्वा:स सोडला आहे.

या खेळाडूसह त्याच्या वडीलांचे बारामतीत आल्यानंतर जंगी स्वागत करण्यात आले होते. ग्रामीण भागातून लहान वयात या जागतिक स्पर्धेपर्यंत पोहचलेला तो प्रथम खेळाडु आहे. त्यामुळे त्याच्या कोरोना तपासणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.  मंगळवारी(दि ३०) त्या दोघांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सर्वांनी मोठे संकट टळल्याचा आनंद व्यक्त होत आहे. मात्र, रीपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर देखील आरोग्य विभागाकडून त्यांना सात दिवस विलगीकरणात राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती तालुका अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.

टॅग्स :BaramatiबारामतीOmicron Variantओमायक्रॉनSouth Africaद. आफ्रिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या