शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीमुळे डिजिटल व्यवहारांना चालना - परवीनकुमार गुप्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 23:43 IST

परवीनकुमार गुप्ता : ग्राहकांच्या सोयीसाठी ‘योनो’ अ‍ॅप, बँकांना कर्ज वितरणासाठी भांडवल उपलब्ध

कोल्हापूर : नोटाबंदीमुळे पडून असलेला पैसा बँकांमध्ये जमा झाला. तो पुन्हा चलनात आला. त्याचा फायदा तर झालाच; परंतु यामुळे डिजिटल व्यवहारांना मोठी चालना मिळाली, असे मत स्टेट बँकेच्या रिटेल आणि डिजिटल बँकिंग विभागाचे कार्यकारी संचालक परवीनकुमार गुप्ता यांनी व्यक्त केले.

कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेल्या गुप्ता यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी नोटाबंदीला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे मत व्यक्त केले. शुक्रवारी सकाळी गुप्ता यांच्या हस्ते राजारामपुरी शाखेजवळ ई-कॉर्नरचे उद्घाटन झाले. या ठिकाणी पैसे भरणे, काढणे आणि पासबुक भरण्याची सेवा उपलब्ध केली आहे. गुप्ता म्हणाले, कोल्हापूरमध्ये कृषीक्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक आहे; त्यामुळे बँकेने मोठ्या प्रमाणावर कृषी पतपुरवठा केला आहे. नोटाबंदीनंतरच्या दोन वर्षांनंतरच्या परिस्थितीबाबत विचारता ते म्हणाले, मोठ्या प्रमाणावर पैसा पडून होता. तो बँकेमध्ये आला नव्हता; परंतु नोटाबंदीमुळे तो बँकांमध्ये भरला गेला. बँकांना कर्जवितरणासाठी भांडवल उपलब्ध झाले. पर्यायाने देशासाठी ही नोटाबंदी उपयुक्त ठरली. बँकेच्या ‘योनो’ अ‍ॅपची माहिती सांगताना ते म्हणाले, या अ‍ॅपमध्ये तीन प्रकारच्या सुविधा आम्ही ग्राहकांना उपलब्ध करून देत आहोत. बँकिंग सुविधा तर आहेच. त्यासोबतच ‘एसबीआय’च्या सर्व विमा योजना, म्युच्युअल फंडाचीही सुविधा देण्यात आली आहे.तसेच टाईप केलेल्या ८५ ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहक खरेदीही करू शकतात. ज्यामध्ये नेहमीपेक्षा जास्त सवलत दिली जाते. काही घटनांमुळे कर्जदारांबाबत आता केंद्र शासनाने कडक धोरण स्वीकारले असून, बँकेनेही भ्रष्टाचाराविरोधी जनजागरण सुरू केले आहे.बँकेकडे उपलब्ध असलेल्या माहितीचे विश्लेषण करूनग्राहकांना अधिकाधिक गतिमान सेवा देण्यावर भर राहील, असे गुप्तायांनी सांगितले. त्यावेळी सरव्यवस्थापक संजयकुमार, पुणे उपव्यवस्थापक आबिदूर रहमान, विभागीय व्यवस्थापक प्रदीप देव उपस्थित होते.पारदर्शकता वाढलीनोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहाराला सरकारने पाठिंबा दिला. प्रोत्साहन दिले. यामुळे एटीएम, इंटरनेट बँकिंग, स्मार्टफोनच्या माध्यमातून बँकिंगमध्ये वाढ झाली. ज्यामुळे पारदर्शकताही वाढली. स्टेट बँकेचे ८३ टक्के व्यवहार ‘एटीएम’च्या माध्यमातून होत असून, केवळ १३ टक्के व्यवहार बँकेतून होतात, असेही परवीनकुमार गुप्ता यांनी सांगितले. 

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरणPuneपुणे