शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

आंतरराष्ट्रीय स्तरावर आयुर्वेदाचे महत्त्व अबाधित : डॉ. अस्मिता वेले;  ‘केशायुर्वेद’तर्फे पुण्यात परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 12:48 IST

संशोधनात्मक आयुर्वेद पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत’’, असे प्रतिपादन हंगेरीतील भारतीय दूतावासातील आयुष विभागाच्या अध्यक्षा डॉ. अस्मिता वेले यांनी आयुर्वेदावरील पहिल्या आंतरराष्ट्रीय परिसंवादात केले. 

ठळक मुद्देआयुर्वेद सर्व देशांपर्यंत पोहोचू लागले आहे : डॉ. अस्मिता वेलेकेशायुर्वेद आणि बीव्हीजी इंडियातर्फे आयुर्वेदावरील पहिला आंतरराष्ट्रीय परिसंवाद

पुणे : ‘‘युरोपीय देशांसहित जगभरात आयुर्वेदाबाबत जागृती वाढत आहे. अनेक देश आयुर्वेदाला मुख्य उपचारपद्धती म्हणून स्वीकारू पाहात आहेत. त्यामुळे आयुर्वेदाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. भारताकडे योग आणि आयुर्वेद निर्यात करण्यासारख्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. संशोधनात्मक आयुर्वेद पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत’’, असे प्रतिपादन हंगेरीतील भारतीय दूतावासातील आयुष विभागाच्या अध्यक्षा डॉ. अस्मिता वेले यांनी केले. केशायुर्वेद आणि बीव्हीजी इंडियातर्फे आयुर्वेदावरील पहिल्या आंतरराष्ट्रीय परिसंवादात डॉ. वेले बोलत होत्या. या वेळी मंदार जोगळेकर, डॉ. हरीश पाटणकर, डॉ. दत्ताजी गायकवाड, डॉ. अजित कोल्हटकर, डॉ. सुकुमार देशमुख, अस्मा इनामदार,  प्रियांका चोरगे  उपस्थित होते. डॉ. सुकुमार देशमुख, डॉ. अस्मा इनामदार, डॉ. प्रियांका चोरगे यांनीही मनोगत व्यक्त केले.  डॉ. वेले म्हणाल्या, ‘‘वैद्यांनी प्रत्येक गोष्टीचा दस्तावेज ठेवला पाहिजे. आयुर्वेद सर्व देशांपर्यंत पोहोचू लागले आहे. भारत सरकारचे आयुष मंत्रालयही त्यासाठी प्रयत्नशील आहे. प्रत्येक देशात आयुषमार्फत भारतीय दूतावासात आयुर्वेदाचे अध्यासन स्थापन केले जात आहे. त्यामुळे परदेशात नव्याने आयुर्वेदात काम करू पाहणाऱ्यांना संधी आहेत. त्याचा फायदा भारतीय वैद्यांनी घेऊन आपल्या आयुर्वेदाचा जगभर प्रसार केला पाहिजे.’’डॉ. भावना उपाध्याय यांनी सूत्रसंचालन केले. दत्ताजी गायकवाड यांनी आभार मानले.

टॅग्स :Puneपुणे