शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आधार कार्ड संकल्पनेचा लग्नपत्रिकेत आविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 20:31 IST

आधार कार्डचा आधार घेऊन जुन्नर येथील नवदाम्पत्याने स्वत:च्या लग्नाची पत्रिका तयार केली आहे.

ठळक मुद्देवेगळेपणाची चर्चा : क्यूआर कोड स्कॅन केल्यास दिसू लागतो प्रि वेडींग व्हिडीओक्यू आर कोडला मोबाईलद्वारे स्कॅन केले असता या नवदांपत्याच्या प्री वेडींगचा व्हिडीओ

जुन्नर :  आधार कार्ड सक्तीचे असावे की नसावे, आधारला जोडलेली माहिती गुप्त राहते की नाही यावर सर्वत्र चर्चाचर्वण सुरु असतानाच आधार कार्डचा एका नवदाम्पत्याने खुबीने वापर केला आहे. लग्नासाठी नवनवीन संकल्पना राबवित असतानाच आधार कार्डची लग्नपत्रिकाच या दाम्पत्याने तयार केली आहे. विशेष म्हणजे आधारवरील क्यूआर कोडचाही यामध्ये खुबीने वापर करण्यात आला आहे. भारतीय नागरिकाची ओळख म्हणून आधार कार्ड अस्तित्वात आले. आधारवरुन आजवर बरेच वादंग उठले. मात्र, आधार कार्डचा आधार घेऊन जुन्नर येथील नवदाम्पत्याने स्वत:च्या लग्नाची पत्रिका तयार केली आहे. येथील विद्या इंटरनॅशनल स्कूलमधील संगणक शिक्षक रविकिरण कुंभोजे-तसेच जुन्नरमधील कथ्थक शिक्षिका मयुरी यंदे या जोडप्याने ही संकल्पना अस्तित्वात आणली. या दोघांचा विवाह कोल्हापूर येथे होणार आहे. त्यासाठी आधार कार्डच्या संकल्पनेचा वापर करुन ही पत्रिका तयार करण्यात आली आहे. आधारवर ज्याठिकाणी नागरिकाचे छायाचित्र असते. त्याठिकाणी पती पत्नीचा फोटो छापण्यात आला आहे. तर कार्डवर दोघांचीही नावे देण्यात आली आहेत. नोंदणी क्रमांकाच्या जागी विवाहाची तारीख अतिशय खुबीने देण्यात आली आहे. विवाहस्थळ, विवाहमुहूर्तही सुटसुटीतपणे देण्यात आल्याने ही आधार पत्रिका अधिकच आकर्षक बनली आहे. आधार कार्डमध्ये जसा क्यू आर कोड असतो. त्याचप्रमाणे क्यूआर कोड देखील पत्रिकेमध्ये वापरण्यात आला आहे. या क्यू आर कोडला मोबाईलद्वारे स्कॅन केले असता या नवदांपत्याच्या प्री वेडींगचा व्हिडीओ दिसायला लागतो. ही वैशिष्ट्यपुर्ण संकल्पना घेऊन पत्रिका छापल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. तंत्रज्ञानाचा खुबीने वापर केलेल्या या लग्नपत्रिकेच्या वेगळेपणाची चर्चा होत आहे. ‘नात्यांसाठी नाती जुळती, हीच खरी संस्कृती’ असा संदेशही या पत्रिकेच्या माध्यमातून या नवदाम्पत्याने दिला आहे. 

 

टॅग्स :Junnarजुन्नरmarriageलग्नAdhar Cardआधार कार्ड