शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सी-डॅक देणार कर्करोगावरील संशोधनाला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 02:22 IST

सेंटर फॉर डेव्हलपमेंट आॅप अ‍ॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग (प्रगत संगणन विकास केंद्र) आगामी काळात महासंगणकाद्वारे कर्करोगावर संशोधन करण्यावर मोठा भर देणार आहे. शरीर यंत्रणेसाठी सुयोग्य अशी ‘पी-५३’ रेणूची प्रतिकृती बनविण्यासाठी औैषध द्रव्यांच्या पुनर्रचनेचा अभ्यास केला जाणार आहे.

पुणे : सेंटर फॉर डेव्हलपमेंट आॅप अ‍ॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग (प्रगत संगणन विकास केंद्र) आगामी काळात महासंगणकाद्वारे कर्करोगावर संशोधन करण्यावर मोठा भर देणार आहे. शरीर यंत्रणेसाठी सुयोग्य अशी ‘पी-५३’ रेणूची प्रतिकृती बनविण्यासाठी औैषध द्रव्यांच्या पुनर्रचनेचा अभ्यास केला जाणार आहे. मुंबईचे टाटा मेमोरियल हॉस्पिटल; तसेच अमेरिकेच्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेशी संवाद साधला आहे, अशी माहिती सी-डॅकचे महासंचालक डॉ. हेमंत दरबारी यांनी दिली.सी-डॅकच्या परम शावक- आभासी वास्तव (व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी) या नवीन महासंगणकाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. दरबारी यांनी औषधद्रव्यांच्या उद्दिष्टांची पुनर्तपासणी करण्याबद्दलही त्यांच्या एका पथकाचे काम सुरू असल्याची माहिती दिली. ‘‘पी-५३ म्हणजेच ट्युमर प्रथिन हे पेशीचक्राचे नियंत्रण करणाºया प्रथिनाशी संबंधित असे जनूक आहे. म्हणूनच ते ट्युमर सप्रेसर (अर्थात - गाठीचे दमन करणारे) म्हणून काम करते.औषधद्रव्यांची पुनर्रचना (किंवा त्यांच्या उद्दिष्टांची पुनर्तपासणी) म्हणजे, आधीपासून माहीत असलेल्या औषधीद्रव्यांचा व संयुगांचा नवीन रोगांवरील उपचारास वापर. या संकल्पनेंतर्गत औषधद्रव्यांच्या पुनर्रचनांचा अभ्यास सी-डॅक, करत असून, मधुमेहावरील औषधद्रव्यांचा उपयोग स्तनांच्या कर्करोगावरील संशोधनासाठी केला जाऊ शकतो, असेही डॉ दरबारी यांनी सांगितले.संरक्षणक्षेत्रात रणांगणाचे प्रत्यंतर देणारी प्रणाली तयार करण्यासाठी; तसेच जाहिरातक्षेत्रात, शिक्षणक्षेत्रात, वाहन-अभियांत्रिकीमध्ये, इतकेच काय तर पुरातत्त्वशस्त्रामध्येही या महासंगणकाचा उपयोग करता येणे शक्य आहे. कालवश झालेली द्वारकेसारखी प्राचीन राज्ये आणि हडप्पासारख्या संस्कृतीमधील मूळ रचना डोळ्यांसमोर आणून त्यांची पुनर्निर्मितीही करणे या यंत्रामुळे शक्य होणार आहे. असे डॉ. दरबारी यांनी सांगितले.मधुमेहावरील औषधद्रव्यांचा स्तनांच्या कर्करोगावर उपचारमानवामधील मधुमेहावरील औषधद्रव्यांचा उपयोग स्तनांच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो; अन्यथा तसे औषध मानवी वापरासाठी परिपक्व होण्यासाठी दीर्घकाळापर्यंत वाट बघावी लागते. याखेरीज, आयुर्वेदासारख्या प्राचीन ज्ञानाचाही कर्करोगावरील उपचारप्रणालीसाठी कसा उपयोग होऊ शकतो, यावरही अभ्यास सुरू आहे. - डॉ. हेमंत दरबारी, महासंचालक, सी-डॅक

टॅग्स :cancerकर्करोग