शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जनहित का ठेकेदाराचे हित? : महापालिकेकडून करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 14:23 IST

गेल्या सहा महिन्यांपासून नगररस्त्यावरील पदपथ तोडून पुन्हा नव्याने उभारण्याचे काम सुरू आहे...

ठळक मुद्देसुस्थितीतील पदपथ उध्वस्त खराडी बायपास ते चंदननगर दरम्यानचा उत्तम दर्जाचा पदपथ तोडून तो नवीन करण्याचा घाट

- विशाल दरगुडे - चंदननगर : कधी कधी महानगरपालिकेचे अधिकारी जनहिताची कामे करतात की ठेकेदाराची कामे करतात हेच कळत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, नगररस्त्यावर बायपास ते चंदननगर दरम्यान असलेला उत्तमदर्जाचा पदपथ तोडून पुन्हा नव्याने पदपथ तयार करण्याचे काम सुरू केले आहे. यापूर्वी नगररस्त्यावर जवळपास पदपथ पूर्ण करण्यात आलेले आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून नगररस्त्यावरील पदपथ तोडून पुन्हा नव्याने उभारण्याचे काम सुरू आहे.  विमाननगरपासून ते खुळेवाडी फाटा दरम्यान चांगले पदपथ सोडून पुन्हा नव्याने पदपथ तयार करण्यात आला आहे; मात्र ते गरज नसतानाही ही केवळ टक्केवारीसाठी हे अधिकारी ठेकेदारांचे भलं करण्यासाठी स्वत:चं भलं करण्यासाठी चांगले पदपथ तोडून पुन्हा नव्याने पदपथ तयार करून, जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत आहे; मात्र जे केलं ते केलं मात्र पुन्हा पुण्याच्या दिशेने जाताना बायपास ते चंदननगर दरम्यान असलेला उत्तम दर्जाचा पदपथ सध्या तोडण्याचे काम जोरात सुरू आहे, हे करत असताना प्रश्न पडतो की, एवढे चांगले पदपथ हे अधिकारी का तोडत आहे, त्याचे उत्तर म्हणजे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातलं साटंलोटं असून ते सर्वसामान्यांच्या कररूपातून येणाऱ्या पैशाची उधळपट्टी करत आहे.  असे नगररस्त्यावर सातत्याने गेल्या वर्षभरात दिसून येत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे असून तसे न झाल्यास सातत्याने चांगली कामे ठेकेदारांसाठी पुन्हा तोडायची, ती पुन्हा करायची, पुन्हा तोडायची, पुन्हा करायची अशी परिस्थिती असून यावर कोणी अंकूश ठेवणार कि नाही ?.......अधिकारी ठेकेदारांसाठी काम करतात ?नगररस्त्यावर खराडी बायपास ते चंदननगर दरम्यानचा उत्तम दर्जाचा पदपथ तोडून तो नवीन करण्याचा घाट घातला आहे, हे करत असताना प्रश्न असा पडतो की, या पदपथाचा अतिशय कमी  नागरिक वापर करत असताना त्याची कुठल्याही प्रकारची  झीज झाली नसताना तो का तोडत आहे, त्याचे उत्तर असे आहे की, अधिकाºयांसाठी हे जनहिताचे नसून, ते ठेकेदारहिताचे आहेत........पदपथ जुना झाला म्हणजे खराब झाला का ?नगररस्त्यावर चांगले पदपथ तोडून नव्याने जर पदपथ तयार करायचे काम चालू असेल, तर काय समजावे, असा प्रश्न पडतो. नगररस्त्यावरील चांगले उत्तम दर्जाचे पदपथ असून, ते केवळ जुने झाले म्हणून खराब झाले, असा अर्थ लावून जर ते तोडले जात असतील, तर ते अतिशय चुकीचे असून याला महापालिकेचे अधिकारी जर असे करत असतील, तर नागरिकांच्या कररूपाच्या पैशाची उधळपट्टी आहे. असेच म्हणावे लागेल. कारण, एवढे चांगले पदपथ तोडून विनाकारण नवीन पदपथ तयार करून, जुन्या चांगल्या पदपथांवर केलेला खर्च वाया घालविला आहे.

टॅग्स :PuneपुणेChandan NagarचंदननगरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका