शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

InternationalYogaDay2018: योगाला दिला नृत्याचा तडका आणि तयार झाला नवा अविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2022 17:08 IST

पुण्यातील 'फिटनेस फ्रीक' या ग्रुपने योगाला नृत्याचा तडका देत योगानृत्य तयार केले आहे. संगीताच्या मदतीने योगासने करण्याची संकल्पना अमलात आणण्यासाठी या ग्रुपने विशेष प्रयत्न केले आहेत.

पुणे : योगासन हे आपल्या शारीरिक आरोग्यासाठी उत्तम व्यायाम आहे असे म्हणतात. पण काहीवेळा योगामध्येही नावीन्य हवे असे वाट्ते.हाच विचार करत पुण्यातील 'फिटनेस फ्रीक' या ग्रुपने योगाला नृत्याचा तडका देत योगानृत्य तयार केले आहे. संगीताच्या मदतीने योगासने करण्याची संकल्पना अमलात आणण्यासाठी या ग्रुपने विशेष प्रयत्न केले आहेत.

     फिटनेस फ्रीक ग्रुपच्या अध्यक्षा वैशाली नाफडे या नृत्यदिग्दर्शिका असून त्यांना मदत म्हणून शिकवण्याची सर्व जबाबदारी राधिका फडके घेतात. या ग्रुपमध्ये वीस स्त्री सदस्य असून सर्व वयाने चाळीशी यापेक्षा पुढे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यास सुरुवात केल्यानंतर फिटनेस फ्रीक ग्रुपने हे पाऊल उचलले. जवळपास एक वर्षांपासून हा ग्रुप निरनिराळ्या प्रकारचे योगा नृत्य सादर करत आहे. उष्टसन, सूर्यनमस्कार, प्रार्थनासन, विरासन, योगमुद्रासन, गोरक्षासन, स्वस्तिकासन, वज्रासन यातून योगा नृत्य दाखवले जाते. तसेच या नृत्यप्रकारात वेस्टर्न गाणी आणि त्यावर कथक अथवा गरबा नृत्य सादर केले जाते.याच बरोबर पार्टनर योगा हा दोन व्यक्तींनी एकत्रित करायचे नृत्यही विकसित करण्यात आले आहे. या प्रकारात विशेषतः उठाबशा काढण्याचा व्यायाम केला जातो. वयाची चाळीशी, पन्नाशी  उलटल्यावर स्त्रियांना हे करणे अवघड होते.अशा वेळी एकमेकींच्या साहाय्याने हा नृत्यप्रकार केला जातो.एकाच पद्धतीने योगा करण्याचा कंटाळा येत असेल तर हा एक उत्तम पर्याय असल्याचे मत नृत्यदिग्दर्शिका नाफडे यांनी व्यक्त केले.

    योगा नृत्याची संकल्पना समाजासमोर मांडून लहान मुले तसेच तरुण वर्ग यात जास्तीत जास्त सहभागी होईल असा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.या योगामुळे दिवसभर ऊर्जा असल्यासारखे वाटते, प्रसन्नतेचा अनुभव येत असल्याचे राधिका फडके यांनी सांगितले.शबनम चावक यांनी योगा नृत्य करताना आनंद वाटत असल्याची भावना व्यक्त केली. वेगवान नृत्य करणे शक्य नसेल तर हा पर्याय जरूर अनुभवावा अशी शिफारसही त्यांनी केली. 

टॅग्स :PuneपुणेYogaयोगासने प्रकार व फायदेInternational Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनdanceनृत्य