शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या वाहतूककोंडीवर आंतरराष्ट्रीय मोहोर, अमेरिकेतील संशोधकांच्या अभ्यासातून उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 02:31 IST

पुण्यातील वाहतूककोंडी ही तशी नित्याचीच. किंबहुना पुणे व वाहतूककोंडी हे समीकरणच बनले आहे. त्यावर आता एका आंतरराष्ट्रीय अभ्यासातून मोहोर उमटली आहे.

पुणे  - पुण्यातील वाहतूककोंडी ही तशी नित्याचीच. किंबहुना पुणे व वाहतूककोंडी हे समीकरणच बनले आहे. त्यावर आता एका आंतरराष्ट्रीय अभ्यासातून मोहोर उमटली आहे. अमेरिकेतील चार संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार भारतात सर्वाधिक वाहतूककोंडी होणाऱ्या शहरांमध्ये पुणे सातव्या क्रमांकावर आले आहे. त्या तुलनेत मुंबईची स्थिती अधिकच दयनीय असून या यादीत मुंबई दुसºया स्थानावर आहे.नॅशनल ब्युरो आॅफ इकॉनॉमिक रिसर्चअंतर्गत अमेरिकेतील चार संशोधकांनी भारतातील १५४ शहरांच्या वाहतुकीचा अभ्यास केला आहे. ‘मोबिलिटी अँड कंजक्शन इन अर्बन इंडिया’ या नावाने याबाबतचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. सर्वाधिक वाहतूककोंडी, सर्वाधिक वेगवान वाहतूक आणि सर्वाधिक संथ वाहतूक असलेल्या शहरांची यादीच अहवालात देण्यात आली आहे. या शहरांमधील वाहुतकीचा वेग आणि वाहतूककोंडीबाबत आधुनिक तंत्रज्ञान आणि गुगल मॅप्सच्या मदतीने हा अभ्यास करण्यात आला आहे. विश्लेषणासाठी शहरांची लोकसंख्या, वाहनाची संख्या, दररोजचा सरासरी प्रवास, विकासदर, विस्तार, रस्त्यांची स्थिती असे विविध निकष विचारात घेण्यात आले. सर्वाधिक वाहतूककोंडी असलेल्या शहरांच्या यादीत बंगळुरू शहर पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल मुंबईचा क्रमांक लागतो. त्यानंतर दिल्ली, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद ही शहरे आहेत. या महानगरांच्या यादीत पुणे सातव्या स्थानी आहे, तर महाराष्ट्रातीलच नागपूर शहर सतराव्या क्रमांकावर आहे.सर्वाधिक संथ वाहतूक असलेल्या शहरांच्या यादीतही पुण्याचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत पुणे २० व्या स्थानी आहे. पहिल्या क्रमांकावर कोलकाता तर बंगळुरू व हैदराबाद ही शहरे अनुक्रमे दुसºया व तिसºया क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे या यादीत पुणे व मुंबईसह महाराष्ट्रातील अकोला शहराचाही समावेश झाला आहे. देशातील पहिल्या दहा वेगवान शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकाही शहराचा समावेश करण्यात आलेला नाही. या यादीत तमिळनाडू येथील राणीपेट शहराने पहिला क्रमांक पटकावला आहे.रस्त्यांची वाईट स्थिती : अहवालात निरीक्षण नोंदवले1 वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची वाढत जाणारी संख्या हे वाहतूककोंडीचे ढोबळ कारण मानले जाते. पण त्यापेक्षा रस्त्यांची वाईट स्थितीही वाहतूककोंडी तसेच संथ वाहतुकीसाठी कारणीभूत असल्याचे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे. मागील काही वर्षांत पुणे शहराचा वेगाने विकास झाला आहे. त्यामुळे दुचाकींबरोबरच चारचाकी वाहनांची संख्याही प्रचंड वेगाने वाढली.2प्रादेशिक परिवहन विभागाच्या अहवालानुसार, पुणे शहरात मार्च २०१८ अखेरीस दुचाकींची संख्या २७ लाखांच्या पुढे, तर चारचाकी वाहनांचा आकडा साडेसहा लाखांवर गेला आहे. एकीकडे वाहनांची संख्या वाढत असताना रस्त्यांची स्थिती मात्र सुधारताना दिसत नाही.3चौका-चौकामध्ये सिग्नल, सततची रस्तेखोदाई, अशास्त्रीय वेगनियंत्रक, बेशिस्त वाहनचालक, रस्त्यांवरील अतिक्रमणे, अनधिकृत विक्रेते यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. परिणामी वाहतूककोंडी, तसेच संथ वाहतूक नित्याची झाली आहे.

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडी