शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश, महिला एजंटांना अटक, २ परदेशी तरुणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 02:44 IST

आर्थिक कारणामुळे नोकरीच्या आशेने भारतात येणा-या परदेशी तरुणींना आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायाला लावण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे़ दक्षिण विभागाच्या संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक पथकाने दोन महिला एजंटांना अटक केली आहे़.

पुणे : आर्थिक कारणामुळे नोकरीच्या आशेने भारतात येणा-या परदेशी तरुणींना आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायाला लावण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे़ दक्षिण विभागाच्या संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक पथकाने दोन महिला एजंटांना अटक केली आहे़ उजबेकिस्तान आणि रशिया येथील दोन परदेशी महिला तसेच, मूळच्या दिल्लीच्या राहणाºया सध्या मुंबईमध्ये व्यवसायासाठी आलेल्या २ मॉडेल यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे आढळून आले़सहायक पोलीस आयुक्त समीर शेख आणि गुंडा स्कॉडचे पोलीस निरीक्षक राम राजमाने यांनी सांगितले की, मुंबई येथून दोन महिला एजंट, मॉडेलिंग करणाºया मुली व परदेशी मुलींना घेऊन वेश्याव्यवसायासाठी पुण्यात येत असल्याची माहिती मिळाली़ पोलिसांनी बनावट गिºहाईकाच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला़ त्यांनी रात्री १० वाजता हॉटेल आॅर्चिडसमोरील चौकामध्ये ओव्हर ब्रीजखाली येत असल्याचे कळविले़ त्याप्रमाणे गुन्हे शाखेने सापळा रचला़ एका मोटारीतून या दोन महिला व एक मुलगी आली़ त्यापाठोपाठ आणखी एका मोटारीतून तीन मुली आल्या़ बनावट गिºहाईकाने त्यांच्याकडे जाऊन चौकशी करून इशारा करताना पोलीस पथकाने त्यांना पकडले़ या दोन्ही महिला एजंट मुंबईतील अंधेरी येथील राहणाºया आहेत़या महिला एजंट फ्री लान्स इव्हेट मॅनेजमेंटचे काम करतात़ नव्याने मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण करणाºया मॉडेल्स यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जातो़ यातील दलाल हे तारांकित हॉटेललाच प्राधान्य देतात़ त्याशिवाय उच्च दर्जाची दारू, सिगारेट इत्यादीची व्यवस्था मुलीला घेऊन जाणाºया ग्राहकाला करावी लागते़ ग्राहकाला त्याच्या नावावर रूम बुक करून त्या हॉटेलचे नाव व रूमनंबर एजंटला कळवावे लागते़ मुंबईतील दोन मॉडेलचा यात सहभाग आढळल्याने या प्रकरणात मुंबईतील आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत़ या क्षेत्रात असणाºया काही जणांची चौकशी होण्याची शक्यता आहे़- मॉडेलिंग करणाºया या मुली २२ व २५ वर्षांच्या असून परदेशी मुली २६ व २७ वर्षांच्या आहेत़ या मुली नोव्हेंबरमध्ये ट्युरिस्ट व्हिसा घेऊन आल्या होत्या़ या दलालांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर रॅकेट असून मलेशिया, नेपाळ, हाँगकाँग या ठिकाणी यापूर्वी या परदेशी मुली जाऊन आल्या आहेत़ मॉडेलिंग करणाºया मुली अनेक व्हिडीओ साँगमध्ये असून त्यांच्यातील एकीने दक्षिणेतील एक चित्रपटही साईन केला आहे़

टॅग्स :Crimeगुन्हा