शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
3
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
4
'अमेरिका स्वतः रशियन तेल खरेदीची परवानगी देते; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
5
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
6
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
7
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
8
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
9
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
10
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
11
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
12
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
13
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
14
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
15
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
16
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
17
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
18
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
19
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
20
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?

घडताहेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील योगपटू

By admin | Updated: June 21, 2016 00:13 IST

शहरात योगा प्रशिक्षण देणाऱ्या अनेक केंद्र आणि शाखा असल्या.ने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होत आहेत. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या खेळाडूंची संख्या

पिंपरी : शहरात योगा प्रशिक्षण देणाऱ्या अनेक केंद्र आणि शाखा असल्या.ने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होत आहेत. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या खेळाडूंची संख्या अर्धशतक पार करून गेली आहे. राष्ट्रीय खेळाडू तर दोनशेच्या वर आहेत. स्पर्धात्मक योगासनाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले जात असल्याने अनेक नवोदित खेळाडू देशपातळीवर आपली छबी उमटवत आहेत. योग्य मार्गदर्शन आणि पाठिंब्यामुळे अनेक खेळाडू सीमा ओलांडून परदेशात देशाचा नावलौकिक वाढवत आहेत. आंतरराष्ट्रीय खेळाडू संदीप भापकर याने तब्बल १७ राष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी कामगिरी करण्याचा विक्रमच केला आहे. तसेच, तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चकमदार यश मिळविले आहे. वैष्णवी आंद्रे हिने सलग ५ वेळा राष्ट्रीय शालेय, सलग ५ वेळा राष्ट्रीय महासंघ आणि तीन वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदके जिंकली आहेत. स्वरदा देशपांडे ही दिल्लीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आॅलिम्पियाड स्पर्धेत प्रतिनिधित्व करीत आहे. साक्षी महाले, सुशांत तरवडे, त्यांची आई राणी तरवडे, श्रेया कंदारे, हृषीकेश मोरे, स्रेहा काळे, सलोनी जाधव, संचिता भोईर, मेघा झंझणे, सचित कुलकर्णी, आर्या गोगावले, सुकेत शहा, पूजा गायकवाड, देवदत्त भारदे, जतीन आव्हाड, ऊर्मिला मोरे, हृषीकेश व्यवहारे, उमा दौंडे यांनी आपापल्या गटात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदके पटकावली आहेत. जुईली पटवर्धन, श्रावणी कुलकर्णी, किरण हेंद्रे, शुभम जगताप, श्रुतिका भंडारे, मृणाल सावंत, तनुजा बांदल, अनिका पेठे, चिन्मयी केळकर, कार्तिक दिसले, चिन्मय जोशी, आयुष देव, आकांक्षा खराडे, आकांक्षा भिलवडकर, राधा हलदुले, अवंती अंबिके, रुचा कानिटकर, श्रेया कुलकर्णी, ईश्वरी दंडगे, नेहा गायकवाड, अरुणा तिकोणे, संगीता दामले, आर्या देव, सागर इंगळे, सुकेत शहा, पूजा गायकवाड, स्वरदा देशपांडे, साक्षी महाले यांनीही आंतरराष्ट्रीय, आशियाई स्पर्धेत चमक दाखविली आहे. सहा वर्षांची सिटी प्राइड स्कूलची श्रेया विभांडिक आणि अमृता विद्यालयाची तन्वी पाटील नेपाळ येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवेश केलेल्या या जिल्ह्यातील सर्वांत लहान खेळाडू आहेत. या दोघी अष्टपैलू खेळाडू असून, लीलया अवघड आसनाचे प्रात्यक्षिक करतात. वरद सुवर्णकार हिची ही या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. चंद्रकांत पांगारे हे भारतीय संघाचे प्रशिक्षक असून, अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश प्राप्त केले आहे. याचबरोबर अनेक शाळा आणि महाविद्यालयाचे खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकले आहेत. शहरात योगा विषयी गोडी वाढत आहे. अनेक नवीन खेळाडूही योगाकडे आकर्षित होत आहे. (प्रतिनिधी)