शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळ्यात आंतरराष्ट्रीय चित्तथरारक स्लॅकलाईन कसरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 14:52 IST

स्लॅकलाईन या साहसी क्रिडा प्रकार म्हणजे दोरवरुन चालणे...

ठळक मुद्देदेशाविदेशातील स्लॅकलायनर, हायलाईनर एकत्र गॅदरिंग, ट्रेनिंग कार्यक्रमाचे लोणावळ्यातील नागफणी पायथा, कुरवंडे ठिकाणी आयोजन स्लॅकलायनर, हायलाईनर या खेळात कोणत्याही प्रकारचे नाही धोके

लोणावळा : येथील शिवदुर्ग मित्र, लोणावळा व स्लॅकलाईन इंडिया असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळा येथे देशाविदेशातील स्लॅकलायनर, हायलाईनर एकत्र करुन त्यांच्यासाठी गॅदरिंग तसेच ट्रेनिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.स्लॅकलाईन या साहसी क्रिडा प्रकार म्हणजे दोरवरुन चालणे. हा प्रकार भारतात प्रचलित होत चालला आहे. याचाच पुढील प्रकार म्हणजे दोन उंच डोंगरावर दोरी बांधून त्यावर बॅलन्स करत चालणे. याला हायलाईन म्हणतात. हायलाईन या प्रकारात भारतात प्रथम हायलाईन करण्याचा मान शिवदुर्गचे संचालक रोहीत वर्तक यानी मिळवला आहे. रोहीतने हा क्रिडा प्रकार वाढवण्यासाठी अनेक खेळाडू तयार केले आहे. लोणावळ्यातील ड्युक्स नोज (नागफणी) पायथा, कुरवंडे याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात स्लॅकलायनर, हायलाईनर याची काही प्रात्यक्षिके दाखवली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय कितीर्चे १० खेळाडू व भारतातील अनेक खेळाडू यात सहभागी झाले आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी या पुर्वी सुमारे एक किलोमिटर लाईनवर चालुन विश्वविक्रम केलेले आहेत. यावेळी लोणावळ्यात सुमारे १.३ किलोमीटर लाईन लावून ते खेळाडू स्वत:चे विक्रम तोडतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. १८ जानेवारी पर्यंत हे गॅदरिंग सुरू राहणार आहे.शिवदुर्ग मित्र, लोणावळा ट्रेकिंग अ‍ॅडव्हेंचर क्लब हा ट्रेकिंग, क्लायंबिंग, रेस्क्यू, ऍनिमल रेस्क्यू, सांस्कृतिक, फिटनेस, सायकलिंग, कब्बडी या विविध क्षेत्रात कार्यरत आहे. सोबतच साहस क्रिडा प्रकाराचे शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षणाचे धडे संस्थेमार्फत दिले जातात. स्लॅकलायनर, हायलाईनर या खेळात कोणत्याही प्रकारचे धोके नाही, सुरक्षेचे सर्व उपाययोजना करुन हा खेळ खेळला जाईल. तरी नागरिकांनी उपस्थित राहून या खेळाची माहिती जाणून घ्यावी असे आवाहन शिवदुर्ग च्या वतीनं करण्यात आले आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळा