शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय सायकल दिन : लाखो सायकलवर नाव टाकणारा '' अवलिया ''

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 13:45 IST

गेली ५४ वर्षे ते सायकलवर नाव टाकण्याचा व्यवसाय करत आहे.

ठळक मुद्देव्यवसायात १९६५ पासून कार्यरत १९६५ मध्ये एक नाव टाकण्याचे पन्नास पैसे घेतले जात सद्य:स्थितीला तीस रुपये १९६५ नंतर १९९० पर्यंत एका दिवसात १० ते १२ सायकलींवर नाव टाकण्याचे काम होतो करत..

- अतुल चिंचली - पुणे : नवीन सायकलवर स्वत:चे नाव टाकण्यात एक वेगळाच आनंद असतो. गेली ५४ वर्षे मी सायकलवर नाव टाकण्याचा व्यवसाय करीत आहे. आतापर्यंत लाखो सायकलींवर नाव टाकण्याचे काम केले आहे, असे मत हणुमंत पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.  पूर्वी नवीन सायकलवर नाव टाकून घेण्याची मजाच वेगळी होती. हे काम नसून एक कला आहे. ती अधिक काळ टिकून राहायला पाहिजे. पूर्वी सायकल चोरीला जाऊ नये, म्हणून सायकलवर नाव टाकले जात होते. सायकलच्या दुकानाबाहेर नाव टाकणारी लोक बसत होती. नागरिक दुकानातून नवीन सायकल विकत घेतली, की लगेच त्या सायकलवर स्वत:चे नाव आणि सायकल विकत घेतल्याची तारीख टाकत असे. सायकल घेतल्यावर नाव टाकण्याची उत्सुकता लोकांमध्ये होती. सायकलवर नाव टाकण्याचा व्यवसाय हणमंत पवार करीत आहेत. हणुमंत पवार पुण्यात लोहियानागर येथे वास्तव्यास आहेत. पत्नी, दोन मुले आणि मुली असे त्यांचे कुटुंब होते. आता मुलांचे विवाह झाले आहेत. पवार यांनी १९६५ मध्ये या व्यवसायाला सुरुवात केली. तेव्हापासून ते आता ५४ वर्षे झाली. ते अजूनही या व्यवसायात कार्यरत आहेत. गणेश रस्ता, फडके हौद या ठिकाणी असणाºया सायकलच्या दुकानाबाहेर असतात. पूर्वी अ‍ॅटलस, हिरो, हर्क्युलस, रॅली, रॉबिनहूड या कंपन्यांच्या सायकली प्रसिद्ध होत्या. या सायकलचे हँडल सिल्व्हर असल्याने त्यावर नाव टाकणे सोपे जात होते. ते उठूनही दिसत असे. सायकलच्या हँडलवर नाव आणि विकत घेतल्याची तारीख टाकली जात होती. १९६५ मध्ये एक नाव टाकण्याचे पन्नास पैसे घेतले जात होते. सद्य:स्थितीला एक नाव टाकण्याचे तीस रुपये घेतले जातात. नाव टाकण्यासाठी स्पंच आणि पट्टी यांचा वापर केला जातो. स्पंच पेन्सिलप्रमाणे हँडलवर उभा धरला जातो. पट्टीच्या स्पंचवर ठोकून हँडलवर नाव कोरले जाते. सायकलवरून लोक दुचाकी व चारचाकी घेण्यास आपली पसंती देऊ लागले. १९६५ नंतर १९९० पर्यंत एका दिवसात १० ते १२ सायकलींवर नाव टाकण्याचे काम करीत होतो. २००० नंतर गाड्यांचे प्रमाण वाढले. त्यामुळे आता एका दिवसात सहा ते सात सायकलींवर नाव टाकण्याचे काम करीत आहे. ..........* या कामाच्या जोरावरच केली मुलांची लग्ने१- सायकलवर नाव टाकणे हे काम नसून एक कला आहे. याबद्दल पवार यांनी एक आठवण सांगितली, १९९५ मध्ये एका व्यक्तीने ही कला पाहून मला तीनशे रुपये बक्षीस दिले.२ -माझ्या कुटुंबात दोन मुली, दोन मुलगे आणि पत्नी असे सदस्य होते. मी या व्यवसायावर माझ्या चारही मुलांची विवाह लावून दिले. सुरुवातीला मला या व्यवसायातून एका दिवसाला दहा ते बारा रुपये मिळत असत. तेव्हा मी एक रुपया बचत करीत होतो. कालांतराने जास्त पैसे बचत करू लागलो, याचा मला मुलांच्या लग्नासाठी फायदा झाला. ३ - सद्य:स्थितीत सायकलवर नाव टाकण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आताची हँडल काळ््या रंगाची आहेत. काळ्या हँडलवर नाव टाकले की दिसत नाही. असे नवीन पिढीचे विचार आहेत. परंतु त्यांचे आई-वडील सोबत असले की नाव टाकण्याचा आग्रह करतात. 

टॅग्स :PuneपुणेCyclingसायकलिंग