शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आंतरक्लब टेनिस : पीवायसी ‘अ’ चॅम्पियन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 03:37 IST

पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटनेतर्फे (पीएमडीटीए) आयोजित सातव्या शशी वैद्य स्मृती आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत इलिट गटात डेक्कन ‘अ’ला २३-११ने नमवित पीवायसी ‘अ’ने रविवारी विजेतेपदाला गवसणी घातली.

पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटनेतर्फे (पीएमडीटीए) आयोजित सातव्या शशी वैद्य स्मृती आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत इलिट गटात डेक्कन ‘अ’ला २३-११ने नमवित पीवायसी ‘अ’ने रविवारी विजेतेपदाला गवसणी घातली.पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या टेनिस कोर्टवर ही स्पर्धा झाली. अंतिम फेरीत पीवायसी अ संघाने डेक्कन अ संघावर १२ गुणांच्या फरकाने सरशी साधत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. १०० वर्षांपुढील गटात पीवायसीच्या डॉ. अभय जमेनिस व केदार शहा या जोडीला डेक्कनच्या नंदन बाळ व जयदीप दाते यांनी ५-६ (१-७)असे पराभूत केले. नंतर खुल्या गटात पीवायसीच्या केतन धुमाळने अभिषेक ताम्हाणेच्या साथीत डेक्कनच्या ऋषिकेश पाटसकर व संग्राम चाफेकर यांच्यावर ६-२ अशा फरकाने विजय मिळवित संघाला ११-८ने आघाडी मिळवून दिली.त्यानंतर ९० वर्षांपुढील गटात पीवायसीच्या जयंत कढे व ऋतू कुलकर्णी यांनी डेक्कनच्या अजय कामत व मदन गोखले यांचा ६-१ असा पराभव करून आपल्या संघाला विजेतेपदाच्या मार्गावर आणून ठेवले. खुल्या गटात केदार शहा व प्रशांत सुतार यांनी डेक्कनच्या विक्रांत साने व मंदार वाकणकर या जोडीचा ६-२ असा सहज पराभव करून पीवायसीच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.विजेत्या पीवायसी ‘अ’ संघाला शशी वैद्य स्मृती चषक व ४०००० रुपये, तर उपविजेत्या डेक्कन ‘अ’ संघाला चषक व २०००० रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर आणि पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव कुमार ताम्हाणे यांच्या हस्ते झाले. पीएमडीटीएचे मानद सचिव अभिषेक ताम्हाणे यांनी सुत्रसंचालन केले.निकाल : इलिट गट : अंतिम फेरी :पीवायसी ‘अ’ वि.वि. डेक्कन ‘अ’ : २३-११ (१०० वर्षांपुढील गट : डॉ. अभय जमेनिस/केदार शहा पराभूत वि. नंदन बाळ/जयदीप दाते ५-६ (१-७). खुला गट : केतन धुमाळ/अभिषेक ताम्हाणे वि.वि. ऋषिकेश पाटसकर/संग्राम चाफेकर ६-२. ९० वर्षांपुढील गट : जयंत कढे/ऋतू कुलकर्णी वि.वि. अजय कामत/मदन गोखले ६-१. खुला गट : केदार शहा/प्रशांत सुतार वि.वि. विक्रांत साने/मंदार वाकणकर ६-२).

टॅग्स :Sportsक्रीडाPuneपुणे