शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा डॉक्टर हातात झाडू घेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 14:17 IST

राज्य सरकारने विद्यावेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या अनिश्चितकालीन संपामध्ये पुण्यातील ससून रुग्णालयातील बी जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर सहभागी झाले आहेत. हे डॉक्टर आपला विरोध गांधीगिरीच्या मार्गाने दाखवत असून रक्तदान करून झाल्यावर त्यांनी ससूनच्या परिसराची स्वच्छता केली आहे. 

पुणे : राज्य सरकारने विद्यावेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या अनिश्चितकालीन संपामध्ये पुण्यातील ससून रुग्णालयातील बी जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर सहभागी झाले आहेत. हे डॉक्टर आपला विरोध गांधीगिरीच्या मार्गाने दाखवत असून रक्तदान करून झाल्यावर त्यांनी ससूनच्या परिसराची स्वच्छता केली आहे. 

          राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना सध्या सहा हजार रुपये विद्यावेतन मिळते. मात्र प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना ११ हजार रुपये विद्यावेतन देण्याच्या २०१५ साली घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची आहे. या डॉक्टरांनी गेल्या तीन दिवसांपासून काम थांबवले असून मागण्या पूर्ण होईपर्यंत संप करण्यावर ते ठाम आहेत. सध्या उत्तर प्रदेशमध्ये १७ हजार ९०० , कर्नाटकमध्ये १९ हजार ९७५, पश्चिम बंगालमध्ये २१हजार, बिहारमध्ये १५ हजार, छत्तीसगढ, ओरिसा, आसाम आणि केरळमध्ये दरमहा २० हजार रुपये इतके विद्यावेतन दिले जाते. पुण्यातील ससून रुग्णालयात अंदाजे २०० प्रशिक्षणार्थी डॉक्टर असून त्यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र तसे काही चित्र नसून अपवाद वगळता ससूनच्या रुग्णांना फारशी अडचण येताना दिसत नाही. यापूर्वी या डॉक्टरांनी रक्तदान करून सरकारचा निषेध नोंदवला असून ९० बाटल्या रक्त ब्लड बँकेत जमा केले आहे. 

टॅग्स :Puneपुणेdoctorडॉक्टरMedicalवैद्यकीयStudentविद्यार्थीStrikeसंपsasoon hospitalससून हॉस्पिटल