शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीच्या जागेची परस्पर विक्री, वडगाव कांदळी येथील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 02:11 IST

कुंपणाने शेत खाल्ले या म्हणीप्रमाणे आदर्श सरपंच पुरस्कारप्राप्त झालेल्या कांदळी गावच्या माजी सरपंचाने गावच्या मालकीच्या २६ आर क्षेत्राचा खोटा साताबारा बनवून तिची विक्री केल्याची धक्कादायक बाब कांदळी गावच्या माजी उपसरपंचाने उघडकीस आणली आहे. 

नारायणगाव - कुंपणाने शेत खाल्ले या म्हणीप्रमाणे आदर्श सरपंच पुरस्कारप्राप्त झालेल्या कांदळी गावच्या माजी सरपंचाने गावच्या मालकीच्या २६ आर क्षेत्राचा खोटा साताबारा बनवून तिची विक्री केल्याची धक्कादायक बाब कांदळी गावच्या माजी उपसरपंचाने उघडकीस आणली आहे. या माजी सरपंचाने फक्त सातबाराच नावावर केला नाही तर ४ आॅगस्ट २०१५ रोजी शासनाची जागेची परस्पर विक्री केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. हे प्रकरण उघडकीस येऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप कुठलीही कारवाई झाली नसल्याने या प्रकरणात महसूल विभागाचे कर्मचारी सामील असावेत अशी चर्चा सुरू आहे़ सध्या तरी हे प्रकरण जुन्नर तहसील कार्यालयात सुनावणीसाठी प्रलंबित आहे़कांदळी येथील गावच्या जमिनीचा खोटा सातबारा तयार करून २६ आर क्षेत्राची विक्री केल्याप्रकरणी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या आदेशाने या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. कांदळी गावचे माजी उपसरपंच संग्र्राम फुलवडे आणि एस़ बी़ पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून गावची जागा बनावट सातबारा तयार करून विकल्याचे उघडकीस आले. फुलवडे व पाटील यांनी केलेल्या तक्रारीमध्ये कांदळीचे आदर्श पुरस्कार प्राप्त असलेले तसेच तंटामुक्तीच्या पुरस्काराबरोबर अनेक पुरस्कार मिळविणारे माजी सरपंच संतोष बढे यांनी आपल्या सरपंचपदाच्या काळात कांदळी गावचे हद्दीतील गट नं. १४१७ मधील १० गुंठे क्षेत्र निरंक होते़ तसेच गट नं़ १४२१मधील १ गुंठा क्षेत्रात धर्मशाळा होती. गट नं़ १४२२ मध्ये ५ गुंठे क्षेत्रात बंगल्याकडे जाणारा भाग म्हणून ओळखला जायचा तर स़ नं़ २९३मध्ये ९ गुंठे क्षेत्र सडकेकडे (बोटीचा धक्का) असा उल्लेख असलेले एकूण २५ आर क्षेत्राचा प्रत्यक्षात २६ क्षेत्राचा सातबारा बनविला़ हा सातबारा तयार झाल्यानंतर या क्षेत्राची विक्री दि़ ४ आॅगस्ट २०१५ रोजी खरेदीखताद्वारे दत्ता गुलाबराव घाडगे यांना रक्कम रु. ६,१०,००० यास विक्री केली़ ही जागा पुणे-नाशिक महामार्गावर मोक्याच्या ठिकाणी असल्याने त्याची प्रत्यक्षात विक्री मोठ्या रकमेमध्ये झाल्याची चर्चा सुरू आहे़ संपूर्ण तालुक्यात सातबारांची आॅनलाईन प्रक्रिया सुरू असताना तलाठी सैद यांना या जागेसंदर्भात संशय आला़ त्यांनी या जागेबाबतच्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर सातबारा बनावट करून त्याच्यावरील फेरफार नंबर हा दुसऱ्या व्यक्तीचा असल्याचे निष्पन्न झाले़ पूर्वीच्या सातबारावर कोणत्याही मालकाचे नाव नसून निरंक असा उल्लेख आहे़ तत्कालिन सरपंच बढे यांनी बनावट सातबारा बनविल्यानंतर या क्षेत्रावर एका पतसंस्थेचे २५ लक्ष रुपये कर्ज देखील काढले होते़ हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर माजी उपसरपंच संग्राम फुलवडे यांनी या प्रकरणाबाबत चौकशीची मागणी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे़-माजी उपसरपंच संग्राम फुलवडे म्हणाले, की या जागेच्या सातबारावर निरंक असा उल्लेख असल्याने ही जागा कोणाची आहे, हे प्रथम स्पष्ट करावे, पूर्वी या ठिकाणी धर्मशाळा होती, त्याची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभाग करीत होते, की महसूल विभाग हे स्पष्ट करावे अशी मागणी तहसीलदार जुन्नर यांच्याकडे केलेली आहे. या जागेचा अपहार करणाºयावर प्रथम फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे ़- याबाबत कांदळीचे तलाठी संजय सैद म्हणाले की, या जागेच्या संदर्भात तक्रारी अर्ज आल्यानंतर २० वर्षांची माहिती घेतली असता या जागेचा सातबारा निरंक असा आहे़ याबाबत भूमिअभिलेख विभागात चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची नोंद आढळून आली नाही़ हा सदरचा सातबारा निरंक असताना त्याचे खरेदीखत कसे झाले, याबाबतची चौकशी सुरू आहे़- जुन्नरचे तहसीलदार किरण काकडे म्हणाले, की ही जागा गायरान नाही परंतु रस्त्याच्या कडेची पडजमीन आहे़ या संदर्भात संबंधित व्यक्तीला नोटीस काढण्यात आली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे़

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतPuneपुणेnewsबातम्या