शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पशुधनांचाही आता उतरवता येणार विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 23:28 IST

योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन : पशुपालकांचे होणारे नुकसान टळणार

पुणे : केंद्र शासनाकडून राज्यामध्ये पशुधन विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ५० हजार पशुधन घटकाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पशुधनांचाही विमा उतरवण्यात येणार आहे. यासाठी पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विधाटे यांनी केले.

जिल्ह्यासह राज्यात दररोज विविध आजार किंवा अपघातात जनावरांचा मृत्यू होतो. त्यांचा विमा नसल्यामुळे पशुपालकांना नुकसान सहन करावे लागते. पशुपालकांचे होणारे हे नुकसान टाळण्यासाठी ‘पशुधन विमा योजना’ सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात सर्वसाधारण घटकासाठी ४० हजार तर विशेष घटकासाठी १० हजार पशुधन घटकाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी तीन कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये शेळी, मेंढी, गाई, म्हशी, शेळी, ससा, डुक्कर, घोडा, गाढव, उंट या प्राण्यांचा विमा काढण्यात येणार आहे. एक वर्षासाठी २.९५ तर तीन वर्षांसाठी ७.५० रुपये प्रिमियम पशुपालकांना भरावा लागणार आहे. यासाठी केंद्र शासनाकडून यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. दरम्यान, केंद्र शासनाने निश्चित केलेल्या भौतिक उद्दिष्टानुसार प्राथमिक स्तरावर प्रत्येक जिल्ह्यात दीड हजार पशुधन घटक याप्रमाणे राज्यातील पशूंचा विमा उतरविण्यात यावा, असे शासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यात ही योजना राबविण्यात येणार आहे.पशुपालकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टरांशी संपर्क साधावा. त्यासाठी आवश्यक ती माहिती भरून या योजनेचा लाभ घ्यावा. जेणेकरून पशू दगावल्यावर पशुपालकाचे होणारे नुकसान टाळले जाईल.डॉ. एस. बी. विधाटे, पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद पुणे

टॅग्स :Puneपुणे