शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर तालुक्यात खनिजतेल साठ्यांची तपासणी, गाळयुक्त खो-यात साठे असण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 05:12 IST

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात भूगर्भात खनिज तेलाचे साठे तपासण्याची काम सुरू झाले आहे. गाळयुक्त खो-यात हे साठे असण्याच्या शक्येतवरून हे काम सुरू झाले आहे.

इंदापूर : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात भूगर्भात खनिज तेलाचे साठे तपासण्याची काम सुरू झाले आहे. गाळयुक्त खो-यात हे साठे असण्याच्या शक्येतवरून हे काम सुरू झाले आहे.याला इंदापूरच्या तहसीलदारांनीही दुजोरा दिला आहे. भारत सरकारच्या पेट्रोलियम एवं प्राकृतिक गॅस मंत्रालयामार्फत देशातील गाळयुक्त खो-यात खनिजतेलाचे साठे असण्याची शक्यता आहे. त्यानुसार त्यांनी २ डी सेस्मिक डेटा संकलित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने ३0 जून २0१६ रोजी तसा अध्यादेश काढला असून, सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाºयांना या उपक्रमाला सहकार्य करण्याच्या सूचना केल्या आहेत.याबाबत इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, आम्हाला शासनाचे याबाबत पत्र आले असून, ही यंत्रणा तालुक्यात दाखल झाली आहे. सध्या आम्ही याची तपासणी करून घेत असल्याचे सांगितले.असे चालते शोधकार्य...सॅटेलाईटचा उपयोग करून राज्यामध्ये सर्व्हे करण्याची स्थाने अक्षांश व रेखांशच्या मदतीने निश्चित करण्यात आलेली आहेत. ही ठिकाणे जीपीएसच्या मशीनने शोधून त्या ठिकाणी साडेचार इंचाचे बोअरवेल घेतले जाते. त्यामध्ये पाणी भरून एक छोटासा ब्लास्ट केला जातो. त्यामुळे येणाºया लहरी एका मशीनमध्ये संकलित केल्या जातात. त्यावरून या ठिकाणी किती प्रमाणात गॅस किंवा पेट्रोलियम पदार्थ आहेत हे समजणार आहे.डेटा संकलित करण्याचे काम ओएनजीसीकडे सुपूर्द करण्यात आले असून, त्यानुसार इंदापूर तालुक्यातील बावडा, शेटफळ हवेली, राजवडी, अगोती, वकीलवस्ती, वडापुरी, तरंगवाडी, वनगळी, करेवाडी ही गाळयुक्त गावे असून येथे खनिज तेलाचे साठे असण्याची शक्यता आहे. त्यानुसार या गावांतील वाड्यावस्त्यांवरील जमिनीत बोअर घेऊन चाचण्या घेण्याचे काम चालू आहे. यासाठी दहा बोअर घेणाºया मशीन व ट्रॅक्टरच्या वाहनांचा ताफा काम करीत आहे.

टॅग्स :Puneपुणे