शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

शहरातील २१ हजार मिळकतींत डेंगी डासांची उत्पत्ती केंद्रे, आरोग्य विभागाची पाहणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 03:42 IST

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने गेल्या तीन महिन्यांत शहरामध्ये विविध ठिकाणी केलेल्या तापसणीमध्ये तब्बल २१ हजार मिळकतींमध्ये डेंगी डासांची व अळ््यांची उत्पत्ती केंद्रे असल्याचे निदर्शनास आले आहे. यातील ७०३ मिळकतदारांकडून आतापर्यंत ३ लाख १६ हजार रुपयांचा दंडदेखील वसूल करण्यात आला आहे.

पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने गेल्या तीन महिन्यांत शहरामध्ये विविध ठिकाणी केलेल्या तापसणीमध्ये तब्बल २१ हजार मिळकतींमध्ये डेंगी डासांची व अळ््यांची उत्पत्ती केंद्रे असल्याचे निदर्शनास आले आहे. यातील ७०३ मिळकतदारांकडून आतापर्यंत ३ लाख १६ हजार रुपयांचा दंडदेखील वसूल करण्यात आला आहे. आतापर्यंत डेंगीचे ४२९, तर चिकुनगुनियाचे ३१७ रुग्ण सापडले आहेत. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी त्यांच्या आसपास आणि कामाच्या ठिकाणी असलेली डेंगी डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करावीत, असे आवाहन महापालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाने केले आहे.डेंगी डासांची उत्पत्ती न होऊ देणे हे त्या - त्या ठिकाणांवरील जबाबदार व्यक्तीचे काम आहे. सार्वजनिक असो अथवा खासगी जागा असो तेथे डासोत्पत्ती होत असल्यास स्थानिक क्षेत्रीय कार्यालयातील कीटक प्रतिबंधक विभागातील अधिकाºयांकडून संबंधित जबाबदार व्यक्तीला नोटिसा देण्यात येतात.जर नोटिसा देऊनही त्यांनी काळजी घेतली नाही, तर त्यांना दंड करण्यात येतो. आतापर्यंत अशा ७०६ मिळकतींकडून हा दंड वसूल करण्यात आला आहे.तसेच खासगी मिळकती (घरे, खासगी जागा, कंपनी, आॅफिसेस) आणि सार्वजनिक ठिकाणी (सरकारी कार्यालये, मैदाने, महापालिकेच्या विविध दवाखाने, उद्याने) मिळून २१ हजारांपेक्षा अधिक मिळकतींच्या इथे डेंगी डासांची उत्पत्तीस्थाने आढळून आली आहेत.विशेष म्हणजे सार्वजनिक ठिकाणांऐवजी खासगी ठिकाणी डासोत्पत्ती तिप्पट होत असल्याचे आढळून आले आहे. खासगीच्या १५ हजार ९१८ ठिकाणी, तर सरकारी ५ हजार ८३८ ठिकाणी डासोत्पत्ती आणि डेंगी डासांच्या अळ््यांची निर्मिती झालेली आहे.साडेपाच हजार नोटिसा दिल्यावारंवार डेंगी डासांची उत्पत्ती झाल्याप्रकरणी कीटक प्रतिबंधक विभागाने शहरातील खासगी आणि सार्वजनिक मिळकतींच्या ५ हजार ६१७ मालकांना व जबाबदार व्यक्तींना नोटिसा दिल्या आहेत, तर ९ लाख तीन हजार या खासगी आणि एक लाख ४७ हजार खासगी मिळकतींची अबेटिंग (कीटकनाशक टाकणे) करण्यात आले आहे.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे